रोहा

   विरजोली येथे आमचा गाव ,आमचा विकास कार्यक्रमांतर्गत गणस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला मार्गदर्शन करण्यासाठी प्रवीण प्रशिक्षक साधुराम बांगारे,श्रीमती शेळके तसेच सरपंच रणजित महांदळेकर,लक्ष्मण वाघमारे, अपूर्वा धामणे,गीता वारगुडा, प्रियांका धुमाळ,उर्वशी वाडकर तसेच विविध ग्रामपंचायतींचे उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच शिक्षक,अंगणवाडी सेविका, कृषी सहायक, आरोग्य सेवक,सीआरपी कर्मचारी व ग्रामसेवक उपस्थित होते.७३ व्या घटना दुरुस्तीमुळे ग्रामपंचायतींच्या अधिकारात वाढ झाली असून गावांच्या विकासासाठी ग्रामपंचायतीना थेट निधी वितरण करण्याचे शासनाचे धोरण आहे.ग्रामपंचायतीनी त्यांचा स्व निधी तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती,राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून मिळणारा निधी अशा विविध निधींच्या मार्फत मिळणारा संभाव्य निधी लक्षात घेऊन गावांच्या विकासाचे नियोजन करावे.

   वार्षिक आणि पंचवार्षिक आराखडा तयार करताना शिक्षण,आरोग्य तसेच उपजीविकेची संसाधने निर्माण करणे यासाठी प्राधान्य देण्यात यावे.तसेच कृषी,ग्रामस्वच्छता, मागासवर्गीय विकास,महिला सबलीकरण,अपारंपारिक ऊर्जा साधनांच्या वापरास प्रोत्साहन देणे याचा समावेश करावा.गावांचे विकास आराखडे तयार करताना सर्व स्तरांतील जनतेचे मत आणि सूचना विचारात घ्याव्यात असे आवाहन देखील यावेळी उपस्थितांनी केले. कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यासाठी विरजोली सरपंच तसेच उपसरपंच राजू कांबळे,किरण पानसरे,प्रकाश धुमाळ तसेच ग्रामपंचायत कर्मचारी यांनी उत्तम सहकार्य केले.

अवश्य वाचा

मोबाईल हिसकावून चोरटे पसार

गाडीची काच फोडून ऐवज लंपास