लोणावळा, 14 नोव्हेंबर 2019:

   जिमी मिस्त्री यांनी आम्ही जे काही डिझाइन किंवा निर्माण करू ते विशेष, प्रेरणादायी, नावीन्यपूर्ण असावे आणि त्यामुळे जास्तीत जास्त व्यक्तींच्या जीवनात चांगले बदल घडावेत या मूलभूत विचाराने, 1991 मध्ये डेला समूहाची स्थापना केली. आमची डिझाइन इकॉलॉजीच्या बाबतीत योग्य असायला हवीत आणि त्यांनी जागतिक डिझाइनमध्ये एखादा नवा पैलू समाविष्ट करायला हवा. डेला समूहाच्या अंतर्गत आम्ही 5 व्यवसाय सुरू केले आहेत – डेला अॅडव्हेंचर, डेला रिसॉर्ट्स, डाटा, डेला व्हिलज व डेला बाय जिमी मिस्त्री.

   लोणावळ्याचे रूपांतर एका सर्वसाधारण हिल स्टेशनमधून लोकप्रिय ठिकाणामध्ये करत, डेला अॅडव्हेंचर हे भारतातील सर्वात मोठे अॅडव्हेंचर पार्क यशस्वीपणे सुरू करणारी व चालवणारी ही पहिली कंपनी असल्याने, लोणावळा हे प्रसिद्ध पर्यटनस्थळ म्हणून विकसित होण्यासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्यांमध्ये डेला समूहाचे नाव आघाडीवर आहे.हा समूह 4 डेला लक्झरी रिसॉर्ट्सच्या माध्यमातून ‘अत्याधुनिक हॉस्पिटॅलिटी’चा प्रवर्तक म्हणून प्रसिद्ध आहे. तसेच, डेला गार्डन व्हिला रिसॉर्ट्स व भारतातील सर्वात हाय एंड लक्झरी इंटिरिअर स्टोअर ‘डेला बाय जिमी मिस्त्री’ हे नवे उपक्रम लवकरच पूर्ण होणार आहेत. डेला समूहाने विविध व्हेंचर्स व उपक्रम यांच्या माध्यमातून लोणावळ्याचा चेहरामोहरचा बदलला आहे. येथे पर्यटकांचा ओघ वाढला आहे आणि त्यामुळे येथील अर्थकारणाला चालना मिळत आहे. 1650 लोकांना रोजगार देणाऱ्या डेलाने स्थानिक अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये योगदान दिले आहे. व्हेंडर, व्यावसायिक व कुशल कामगार यांच्यासाठी निरनिराळ्या संधी उपलब्ध केल्या आहेत.

   लोणावळ्यातील डेलाच्या 1650 इतक्या मनुष्यबळामध्ये, 1000 कर्मचारी हे लोणावळ्यातील आहेत. अॅडव्हेंचर पार्कमधील 90 टक्के कर्मचारी लोणावळा व आजूबाजूच्या भागातील आहेत. डेला समूह स्थानिकांची गुणवत्ता जोपासण्याला आणि त्यांना कायमस्वरूपी रोजगार मिळण्यासाठी त्यांची कौशल्ये विकसित करण्याला प्राधान्य देतो. समूहाबरोबर काम करणारे प्रोफेशनल विशेष कौशल्ये शिकवतात.डेला समूहाने लोणावळावासियांना दिलेले विशेष योगदान म्हणजे, डेलाच्या सर्व क्षेत्रांतील संसाधनांचा वापर करणे आणि 160 गरजू विद्यार्थ्यांच्या जीवनात चांगला बदल घडवणे, हे उद्दिष्ट असणारी डेला अॅडव्हेंचर अँड रिसॉर्ट्स झेड. पी. प्रायमरी स्कूल ही शाळा सुरू करणे. विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या विविध क्षेत्रांमध्ये यशस्वी व्हावे, यासाठी जास्तीचे प्रयत्न केले जातात. विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते आणि बाहेरच्या जगात वावरण्यासाठी, तसेच शिक्षण पूर्ण झाल्यावर एक तर व्यावसायिक बनण्यासाठी किंवा कायमस्वरूपी रोजगार शोधण्यासाठी आवश्यक असलेली कौशल्ये त्यांना दिली जातात.विद्यार्थ्यांचा सर्वांगीण व्हावा, यासाठी प्रयत्न केले जातात. त्यांना इंग्रजी, हिंदी व मराठी या भाषा अस्खलित येण्याकडे लक्ष दिले जाते व आयटी, शिष्टाचार यांचे शिक्षण दिले जाते. डेला रिसॉर्ट्सच्या कॅफेटेरियामधून या विद्यार्थ्यांना दररोज पोषक आहार दिला जातो. विद्यार्थ्यांना स्विमिंग क्लासेससाठी डेला अॅडव्हेंचर पार्क व रिसॉर्ट्सचा स्विमिंग पूल मोफत उपलब्ध केला जातो.

   स्वयंरोजगार निर्माण करतील असे प्रोफेशनल व्यावसायिक घडवणे आणि नियुक्त करण्यासाठी सज्ज असतील असे विद्यार्थी कॉर्पोरेटमध्ये व अन्य संस्थांमध्ये पाठवणे, हे शाळेचे ध्येय्य आहे. शाळेच्या भविष्यातील नियोजनामध्ये, नववी व दहावीचे वर्ग सुरू करन उच्च माध्यमिक शिक्षण व उच्च स्तरीय आयटी शिक्षण सुरू करणे, यांचा समावेश आहे. दहावी झाल्यानंतर विद्यार्थ्यांना करिअरचा योग्य मार्ग निवडण्यास मदत व्हावी आणि कॉलेज प्लेसमेंटच्या बाबतीत यशस्वी व्हावे, या दृष्टीने करिअरविषयक समुपदेशनही केले जाते.डेला अॅडव्हेंचर अँड रिसॉर्ट्समधील शाळेच्या अॅन्युअल डे समारंभामध्ये बोलत असताना डेला समूहाचे सीएमडी जिमी मिस्त्री यांनी सांगितले, “मी डेला अॅडव्हेंचर अँड रिसॉर्ट्स झेड. पी. अॅन्युअल डे समारंभाची नेहमी वाट पाहत असतो. हे 160 विद्यार्थी जणू माझ्या कुटुंबाचाच एक भाग आहेत.

   त्यांना घडवणे, शाश्वत रोजगार मिळवण्यासाठी सक्षम करणे आणि त्यांचे उज्ज्वल भवितव्य साकारणे ही माझी वैयक्तिक जबाबदारी आहे. नजिकच्या काळात, स्थानिक व्यक्तींना सबल करण्यासाठी, विशेषतः आदिवासींनी शिकावे, विकसित व्हावे व चांगला रोजगार मिळवावा, यासाठी लोणावळ्यातील डेला संकुलामध्ये कौशल्य विकास केंद्र सुरू करण्याचे माझे नियोजन आहे.हे विद्यार्थी कामासाठी कोणत्याही संस्थेमध्ये गेले तरी ते यशस्वी व्हावेत, यासाठी आम्ही या मुलांमध्ये संस्कृती, आत्मविश्वास, सादरीकरण क्षमता व विविध कौशल्ये रुजवतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आम्ही त्यांच्यामध्ये देशभक्ती व राष्ट्रीय भावना रुजवतो.यापैकी एकाही मुलाला मजुरी करावी लागू नये, तर त्यांनी समाजासाठी व त्यांच्या समुदायासाठी आदर्श ठरत, प्रतिष्ठेच्या प्रोफेशनमध्ये ताठ मानाने काम करावे, ही माझी जबाबदारी आहे.”

अवश्य वाचा

मोबाईल हिसकावून चोरटे पसार

गाडीची काच फोडून ऐवज लंपास