१२ नोव्हेम्बर २०१९

   म्हसळ्यातील लहान मुलांना घेऊन किल्ले प्रतापगडावर अभ्यासवर्ग घेण्यात आला. असा स्तुत्य उपक्रम शहरामध्ये पहिल्यांदाच होत असल्यागर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठामुळे पालकांमध्ये आणि लहान मुल्लांमध्ये प्रचंड आंनदी वातावरण आहे. गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी किल्ले स्पर्धा घेण्यात येत असते पण लहान मुलांना किल्ला प्रत्यक्ष कसा असतो हे कळावे तसेच छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची निर्मिती करताना आणि गड उभारताना किती त्रास घेतले याची माहिती शाळकरी जीवनातच विद्यार्थ्यांना करून दिले तर फार महत्व्वाचे असते. यासाठीच गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठान तर्फे म्हसळा शहरातील ज्या मुला-मुलींनी किल्ले स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आहे त्यांना किल्ले प्रतापगडावर अभ्यासवर्गाला नेण्यात आले होते.

   मुलांना छत्रपती शिवरायांच्या प्रतापगडावर नेऊन किल्यावर त्या काळात किल्ले बांधण्याची पद्धत, किल्यावरील राहणीमान, गनिमीकावा, युद्धनीती, छत्रपती शिवरायांनी स्वराज्यासाठी केलेले पराक्रम याची माहिती देण्यात आली. फक्त चित्रकला किल्ला बघण्यापेक्षा प्रत्यक्ष किल्ल्यावर जाऊन अनुभव देण्यात आला असून शिवकालीन इतिहासाची आठवण या निमित्त केली आहे. तसेच प्रतिष्ठान तर्फे किल्ले प्रतापगडावर "प्रतापगडाचा रणसंग्राम" ह्या विषयावर श्री. आनंद उतेकर यांनी व्याख्यानपर माहिती दिली. त्यानंतर महाड येथे लहान मुलाना शिवकालीन शस्त्र दाखविण्यात आले असून शिवकालीन शस्त्रांची माहिती श्री. सुरेश पवार यांनी लहान मुलाना दिली.

   ह्या उपक्रमासाठी म्हसळा शहरातील ३० जणांनी सहभाग दर्शवला होता. हा कार्यक्रम यशश्वी होण्यासाठी गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठान चे संस्थापक- अध्यक्ष सचिन कमलाकार करडे, सौ. श्रेया करडे, संतोष कुडेकर,  कौस्थुभ करडे,  विशाल सायकर आदींनी मेहनत घेतली.

अवश्य वाचा

रो- रो सेवा महागडी

रायगडातील कवींचा सन्मान.