सांगोला

   सांगोला शहराच्या मध्यइतर कचऱ्यामुळे भागातून कधीकाळी पाण्याने भरुन वाहणारा ओढा सध्या शहरातील घाण पाणी व गुदमरत असल्याचे दिसून येत आहे. डासांच्या वाढत्या उपद्रव्यालाही हा ओढा आणखीनच हातभार लावत आहे. स्वच्छतेचा आभाव असल्यामुळे ओढ्यात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असल्याचे दिसत आहे. अगदी रहदारीच्या ठिकाणी व पंढरपूर-सांगोला-मिरज हा मार्ग या ओढ्यावरुन जातो. सहाजिकच परगावावरुन ये-जा करणाऱ्या लोकांमध्ये सांगोला शहराच्या स्वच्छतेविषयी प्रश्न उपस्थित केले जात असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

   शहरातून जाणाऱ्या या नाल्याचे कॉंक्रीटीकरण करण्यात आले खरे परंतु अद्यापही घाण पाणी या नाल्यात साठून असल्याचेही दिसते. इतर कचराही नाल्यात पडत असल्यामुळे सदर नाल्याला कचराकुंडीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. ऐतिहासिक सांगोला शहरातील किल्ल्याच्या तटबंदी जवळूनच हा नाला वाहत आहे. त्यामुळे ऐतिहासिक सांगोला शहराच्या तटबंदीला घाणीच्या साम्राज्याचा विळाखा पडला असल्याचे दिसते.

   सांगोला-पंढरपूर रोड नजीक ओढ्यालगतच किल्ल्याचा उर्वरीत बुरुज आजही आहे. या ठिकाणी गवत, काटेरी झाडेही जोमात वाढत आहे. किल्ल्याच्या बुरुजा नजीकच साचलेली घाण ऐतिहासिक सांगोल्यासाठी नक्कीच आत्मचिंतन करावयास लावणारी बाब आहे. जवळच आठवडा बाजारही भरत असल्यामुळे याचा त्रासही नागरिकांना सहन करावा लागत आहे. घाण पाणी, वाढलेले गवत, या पोषक वातावरणामुळे डासांना आपल्या हक्काचेच निवासस्थान निर्माण झालेले आहे.

   आरोग्याच्या दृष्टीने परिसर स्वच्छता अत्यावश्यक आहे. यासाठी शासनाकडूनही मोठ्याप्रमाणात प्रयत्न सुरु आहेत. वेळप्रसंगी कडक पावले उचलत नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारला जातो परंतु शहरातील मोक्याच्या व रहदारीच्या ठिकाणी त्यातल्या त्या ऐतिहासिक स्थळांच्या आवती-भोवती घाणीचे साम्राज्य असे ही बाब नक्कीच गंभीर आहे.  तरी तात्काळ सदर ओढ्यामधील संपूर्ण घाण, कचरा, गवत, काटेरी झुडपे, काढण्यात यावीत. अशी मागणी होत आहे. ओढ्याची मात्र परिस्थिती स्वच्छ निर्मळ पाण्याऐवजी रोगाला निमंत्रण देणाऱ्या सांडपाण्यालाच वाट मोकळी करुन देत असल्याचे दिसत आहे.

अवश्य वाचा

तळोजातील घराला आग