सांगोला 

    सांगोला तालुक्यातील कोळा येथे  श्रेणी-१ च्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये पशुपालकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मागील काही दिवसांपासून आवश्यक ते औषधच दवाखान्यात उपलब्ध नाहीत व उपचार करणे गरजेचे असल्यामुळे त्यांना खाजगी मेडिकलवरून औषध आणून आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. तालुका पशुवैद्यकीय अधिकारी यांनी व  प्रशासनाने दवाखान्यात औषधे उपलब्ध करून पशुपालकांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे.

   कोळा पशुवैद्यकीय दवाखान्यात अधिक माहिती घेतली असता दवाखान्यात जंत व गोचीडाचे व खनीज मिश्रणाचे औषधे कधीच उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले. याचबरोबर खनिज मिश्रण टॉनिक पावडर कॅल्शियम पावडर, लिक्विड, गोची गोच लिक्विड, गोचीड नाशक लिक्विड फवारणीचे जंतनाशक, औषध जंतनाशक, औषध प्रतिजैविक, विविध सलाईन, शेळ्या-मेंढ्यांचे टॉनिक इत्यादी  नसल्याने दवाखान्यात असा बोर्ड लावला आहे. यामुळे शेतकर्‍यांचा जीव मेटाकुटीला आला आहे.
सध्या पावसाळ्याच्या दिवसात जनावरांना साथीच्या आजारांचा जास्त धोका असतो. ग्रामीण भागातून येणारे शेतकरी आपले पशुधन कसेबसे कोळ्याच्या दवाखान्यात घेऊन येतात. मात्र येथे आल्यानंतर त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मागील काही दिवसापासून आवश्यक ती औषधच दवाखान्यात उपलब्ध नाहीत व उपचार करणे गरजेचे असल्यामुळे त्यांना खाजगी मेडिकलवरून औषध आणून फुकटचा मनस्ताप व आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
औषधाचा तुटवडा असून वेळोवेळी मागणी करूनही अद्यापपर्यंत कायम आहे. प्रशासनाने दखल घेऊन तातडीने औषध पुरवठा करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

   कोळा परिसरात जनावराचे साथीचे रोग लाळ, खुरखुज, शेळ्या मेढ्या रोगाचे लसीकरण व्हावे. दवाखान्यात वरिष्ठ अधिकार्‍यांनी लक्ष देवुन प्राथमिक लसीकरण तातडीने करुन शेतकर्‍यांना दिलास द्यावा.

श्री.संभाजीतात्या आलदर, माजी सभापती सांगोला
कोळा पशुवैद्यकीय दवाखान्यात बर्‍याच दिवसापासुन औषधाचा तुटवडा असुन तालुका पशुवैद्यकीय अधिकार्‍यांनी लक्ष देवुन औषध पुरवठा सुरळीत करावा.
दिलीप कोळेकर, माजी ग्रामपंचायत सदस्य कोळा

अवश्य वाचा

तळोजातील घराला आग