कोर्लई, ता.९

   शेतकऱ्यांनी हवामानावर आधारित फळपिक योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन मुरुड तालुका कृषी अधिकारी सूरज नामदास यांनी केले आहे.

   सन.२०११-१२ पासून राज्यात फळपिक योजना राबविण्यात येत आहे. सदर योजना अधिसूचित फळपिकांसाठी अधिसूचित केलेला जिल्हा,तालुका महसूल मंडळात राबविण्यात येते. ही योजना कार्यान्वित करणारी विमा कंपनी शासनाच्या निर्देशित हवामान केंद्र येथे नोंदविलेल्या हवामानाच्या तपशिलानुसार विमा योजनेत भाग घेतलेल्या शेतकऱ्यांना परस्पर नुकसान भरपाई देईन. सन.२०१९-२० मधे ही योजना द्राक्षे, डाळिंब, संत्रा, आंबा, मोसंबी, केळी व काजू या सात फळपिकांसाठी आंबिया बहरात गारपीट आणि इतर विविध हवामान धोक्यापासून संरक्षण देण्यासाठी राबविण्यात येते.

   सदरची योजना नैसर्गिक आपत्ती व हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे फळपिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे, पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे स्थैर्य अबाधित राखणे उद्देश असून योजना कर्जदार शेतकऱ्यांना योजना बंधनकारक असून बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. शेतकऱ्यांना वरील विमा हप्त्याचा भार कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता संरक्षित रकमेच्या ५ टक्के असा मर्यादित ठेवण्यात आला आहे. सदर योजना सन.२०१९-२० मध्ये जिल्ह्यातील तालुक्यात समाविष्ट असणा-या महसूल मंडळात निर्धारित केलेल्या फळपिक निहाय प्रमाणकानुसार भारतीय कृषि विमा कंपनी लि.मार्फत लागू करण्यात येणार असून शासन निर्णयात नमूद केलेल्या महसूल मंडळात केंद्र शासनाने प्राधिकृत केलेल्या महावेद या प्रकल्पाअंतर्गत स्थापन केलेल्या संदर्भ हवामान केंद्रावर नोंदले गेलेल्या हवामानाची आकडेवारी व वरती नमूद केलेली फळपिक निहाय प्रमाणके यांची सांगड घालून शेतकऱ्यांना संबंधित विमा कंपनी मार्फत नुकसान भरपाई परस्पर बँकेद्वारे अदा केली जाईल. तरी मुरुड तालुक्यातील शेतकऱ्यांनी हवामानावर आधारित फळपिक विमा योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन तालुका कृषी अधिकारी सूरज नामदास यांनी केले असून अधिक माहितीसाठी कृषि सहाय्यक व तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. असे कळविले आहे

अवश्य वाचा

म्हसळा येथे माघी गणेशोत्सव