कर्जत -दि.9 

     कर्जत तालुक्यातील बिड ग्रामपंचायत उपसरपंच पदाची निवडणुक पार पडली, बिड ग्रामपंचायत उपसरपंच पदी शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी व मित्र पक्ष आघाडीच्या  वैशाली मनोहर देशमुख यांची बिनविरोधनिवड करण्यात आली. 

     याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य सुधाकर घारे यांनी नवनिर्वाचित उपसरपंच यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.बिड ग्रामपंचायत सरपंच  प्रभावती ताई लोभी, बिड ग्रामपंचायत सर्व सदस्य व सदस्या,  आदी सह कैलास घारे, मनोहर पवार, उत्तम भोईर, शंकरराव देशमुख, तानाजी रूठे आदी उपस्थित होते.

अवश्य वाचा

मोबाईल हिसकावून चोरटे पसार

गाडीची काच फोडून ऐवज लंपास