पाच विद्यार्थी बाळ बाळ बचावले,सरपंचांनी केली रस्त्यावर गतिरोधक बसविण्याची मागणी
जेएनपीटी दि ९ शाळेकडे जाणारे पाच विद्यार्थी हे होणाऱ्या अपघातातून बाळ बाळ बचावले आहेत.त्यामूळे या घटनेचे गांभीर्य ओळखून वेश्वी ग्रामपंचायतीचे सरपंच अजित वसंत पाटील यांनी तात्काळ वेश्वी गावातील बस स्थानकाजवळ गतिरोधक बसविण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभाग, वाहतूक विभागाचे उपायुक्त यांच्या कडे लेखी पत्राद्वारे केली आहे.

    वेश्वी ग्रामपंचायतीचे सरपंच अजित वसंत पाटील यांनी सांगितले की उरण तालुक्यातील चिर्ले,  वेश्वी,दिघोडे,विधणे, मोठी जुई,कोप्रोली,बांधपाडा, ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणात कंटेनर यार्डचे जाळे निर्माण होत आहेत.त्यामूळे अशा वाढत्या प्रकल्पातील दळणवळण व्यवस्था सुरळीत चालू राहण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केंद्र, राज्य आणि जेएनपीटी बंदराच्या माध्यमातून गव्हाण फाटा ते खारपाडा या रस्त्याचे नव्याने रूंदीकरण, डांबरीकरण, काँक्रीटी करण्याचे काम युध्द पातळीवर मे.पी.पी.खारपाटील कंपनीच्या माध्यमातून सुरू केले आहे.

    एकंदरीत मे पी.पी.खारपाटील कंपनीने प्रशासनाच्या देखरेखीखाली सुसज्ज,खड्डे मुक्त रस्त्याचे डांबरीकरण काँक्रीटी करण्याचे काम युध्द पातळीवर हाती घेतल्याने सध्या गोवा,कोकण,तसेच या परिसरातील प्रकल्पात येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची वर्दळ वाढू लागली आहे.मात्र या वाहनांच्या वर्दळीचा फटका हा या रस्त्या लगत असणाऱ्या गावातील रहिवाशांना,वाहनांना रस्ता ओलांडताना बसत आहे.त्यात काल वेश्वी ग्रामपंचायत हद्दीतील विद्यार्थी हे रस्ता ओलांडून प्राथमिक शाळेत जात असताना अचानक समोरून येणाऱ्या कंटेनर टेलरची जोरदार धडक सदर विद्यार्थ्यांना बसली असती.परंतू देव तारी त्याला कोण मारी यातून विद्यार्थी बाळ बाळ बचावले आहेत.

    या घटनेचे गांभीर्य ओळखून वेश्वी ग्रामपंचायतीचे सरपंच अजित वसंत पाटील यांनी तात्काळ वेश्वी गावातील बस स्थानकाजवळ गतिरोधक बसविण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभाग उरण, नवीमुंबई वाहतूक विभागाचे उपायुक्त यांच्या कडे लेखी पत्राद्वारे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केली.असल्याचे चक्क अपघातग्रस्त ठिकाणावर उभे राहून नमूद केले आहे

अवश्य वाचा