बेळगाव,दि.९

आंतरराष्ट्रीय जलरंग चित्रकार  विकास पाटणेकर यांच्या जलरंगातील चित्रांच्या प्रदर्शनाला महावीर भवनआर्ट गॅलरी येथे प्रारंभ झाला.विद्या विनायक पाटणेकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.सोनाली सरनोबत,नागेश चिमरोल  आणि वाय. जी.बिरादार उपस्थित होते.

यावेळी चित्रकार विकास पाटणेकर यांनी आपल्या भाषणात आजवरचा आपला  चित्रकलेचा प्रवास कथन केला.प्रदर्शनात अठरा चित्रे मांडण्यात आली आहेत.प्रदर्शनाच्या उदघाटन प्रसंगी चित्रकार,कलाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.मोनिका अलवाई यांनी सूत्रसंचालन केले.

हे प्रदर्शन दि.१३ नोव्हेम्बर पर्यंत चालणार असून सकाळी साडे दहा ते सायंकाळी साडेसात या वेळेत प्रदर्शन रसिकांना पाहता येईल.दि.१५ नोव्हेंबर रोजी महावीर भवन येथे विकास पाटणेकर यांच्या जलरंगाचे प्रात्यक्षिक होणार आहे.

अवश्य वाचा