जेेनपीटी दि ९

   उरण,जेएनपीटी, पनवेल परिसरात दहशत पसरवून खंडणी उकळणाऱ्या सराईत गुन्हेगाराला नवी मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष दोनच्या पोलिसांनी अटक केली आहे. निलेश दत्तात्रेय देशमुख असे या सराईत गुन्हेगारांचे नाव आहे.

      अटक करण्यात आलेल्या आरोपीं निलेश देशमुख याच्यावर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली होती. त्याच्यावर न्हावाशेवा पोलिस ठाण्यात -११, उरण पोलिस ठाण्यात -२, पनवेल शहर पोलिस ठाण्यााात-४-, सीबीडी, वाशी आणि तळोजा पोलिस ठाण्यात प्रत्येकी एक असे एकूण २० दरोडा, खंडणी, जबरी चोरी, चोरी, जबर दुखापत, अंमलीपदार्थ, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे अशा प्रकारचे गंभिर गुन्हे दाखल आहेत. हे आरोपी गेले अडीच वर्षे तळोजा जेलमध्ये होते.

     मात्र जामिनावर बाहेर आल्यानंतर त्यांनी पुन्हा अशा प्रकारचे गुन्हे करण्यास सुरूवात केली होती. नवी मुंबईचे पोलिस गेले कित्येक दिवस त्यांच्या मागावर होते मात्र ते पोलिसांना चकवा देत होते. गुप्त बातमीदारातर्फे पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरिक्षक गणेश कराड आणि त्यांच्या टिमने पनवेल, करंजाडे येथून निलेश देशमुख याला ताब्यात घेतले. त्याला १० नोहेंबरपर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे. गुन्हे शाखा युनिट दोनचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक के.आर. पोपेरे, सहा. पोलिस निरिक्षक गणेश कराड, पोलिस कर्मचारी सुनिल साळूंखे, संजिव पगारे, महेश चव्हाण, प्रमोद पाटील आदीनी या कारवाईत भाग घेतला होता.

 

अवश्य वाचा

मोबाईल हिसकावून चोरटे पसार

गाडीची काच फोडून ऐवज लंपास