मुंबई-गोवा महामार्गावरील कोलाड-रोहा मार्गावर मुख्य रहदारीच्या ठिकाणी या मार्गावर अनेक दिवसांपासून पडलेल्या भला मोठया खड्डयामुले या मार्गावर प्रवास करणाऱ्या वहान चालकांसह प्रवाशांच्या जिवाला मोठा धोका निर्माण झाला आहे.
           कोलाड-आंबेवाडी नाका हा सदैव गजबजलेले ठिकाण मुख्य बाजारपेठेतील केंद्र बिंदुस्थानी असुन या बाजारपेठेत आजूबाजूला ४० ते ४५ गावातील नागरिक येथील बाजार पेठेत  ये-जा करीत असतात. शिवाय या मार्गावर शाळा कॉलेज, दवाखाना, तलाठी कार्यालय, तहसीलदार कार्यालय व परिसरात विविध पर्यटन स्थळे असुन य़ा मार्गावरुन दररोज हजारोंच्या संख्येने नागरिक प्रवास करीत असतात.शिवाय या मार्गांवर छोटया मोठया व अवजड वाहनांची मोठया प्रमाणात वर्दळ सुरु असते.यामुळे वाहतुक कोंडीही देखील या खड्यांमुळे निर्माण होते.कोलाड-रोहा मार्गावर मुख्य रहदारीच्या ठिकाणी असणारा प्रचंड वहानांच्या रहदारी मुळे रस्ता उखडला असुन मोठ्या खड्यांमुळे वाहन चालक व प्रवाश्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.
                        तसेच मुंबई-गोवा महामार्गावरील कोलाड हे बाजार पेठेतील मध्यवर्ती ठिकाण असुन य़ा पोलीस स्टेशन,तसेच विविध बँका,तर बाजापेठ असल्याने कोलाड परिसरातील ठिक ठिकाणाहुन शाळेत जाणारे विद्यार्थी, दुध विक्रेते,धाटाव औद्योगिकर क्षेत्रात कामावर जाणारे कामगार वर्ग येथुन प्रवास करत असतात.तसेच मुंबई-पुणे-गोवा मार्गावरून येणारी जाणारी वाहतुक मोठया प्रमाणात सुरु असते यामुळे या मुख्य रहदारीच्या ठिकाणी पडलेल्या खड्डयामुले प्रवाश्यांना त्रास सहन करावा लागत आहे यामुळे संबंधितांनी याकडे त्वरीत लक्ष देऊन योग्य ती उपाय योजना करावी.उखडलेला रस्ता अथवा खड्डा त्वरीत दुरुस्त करावा अशी मागणी प्रवाशी वर्गाकडुन केली जात आहे .
    कोलाड-रोहा मार्गावर आंबेवाडी नाका मुख्य रहदारीच्या ठिकाणी रस्ताला पडलेल्या मोठया खड्डयामुळे वहान चालकांसह प्रवाश्यांच्या जिवाला धोका निर्माण झाल्याचे छाया चित्रात दिसत आहे (विश्वास निकम)

अवश्य वाचा

मोबाईल हिसकावून चोरटे पसार

गाडीची काच फोडून ऐवज लंपास