गेली पंचवीस वर्ष अभेद्य असलेल्या शिवसेना भाजप युतीतील वाद विकोपाला गेले आहेत. मुख्यमंत्रीपदावर कोणताही तोडगा न निघाल्याने युती तुटल्यातच जमा आहे. स्वबळावर सत्ता स्थापन करु शकत नसल्याने आणि विधानसभेची मुदत संपल्याने अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांकडे राजीनामा सादर केला. विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने मोठ्या विश्वासाने शिवसेना भाजप महायुतीला स्पष्ट बहुमत देत सत्ता स्थापनेचा जनादेश दिला होता, पण या दोन्ही पक्षांनी जनतेच्या  या जनादेशाचा अवमान करीत राज्याला अस्थिरतेच्या खाईत लोटले आहे. परतीच्या पावसाने राज्यावर मोठे संकट कोसळले आहे. अतिवृष्टीमुळे राज्यातील तीस ते शंभर टक्के पिके वाया गेली आहेत. हातातोंडाशी आलेला घास वाया गेल्याने राज्यातील बळीराजा हवालदिल झाला आहे.  जर राज्यात स्थिर सरकार असते तर बळीराजाला या महासंकटातून वाचवता आले असते. बळीराजाला या महासंकटातून वाचवण्यासाठी  तरी शिवसेना भाजप एकत्र येतील अशी जनतेची अपेक्षा होती पण या दोन्ही पक्षांच्या नेत्यांमधील स्वार्थ आणि इगोमुळे ती पूर्ण होऊ शकली नाही. राज्य संकटात असताना राज्याला स्थिर सरकार देण्याऐवजी राज्याला राष्ट्रपती राजवटीच्या खाईत लोटणाऱ्या या पक्षांना महाराष्ट्रातील जनता कधीही माफ करणार नाही. श्याम बसप्पा ठाणेदार. दौंड जिल्हा पुणे.९९२२५४६२९५

 

अवश्य वाचा

मोबाईल हिसकावून चोरटे पसार

गाडीची काच फोडून ऐवज लंपास