बेळगाव,दि.८-

सरस्वती नगर येथील रहिवासी सौ.विमल कृष्णा मेणसे (८३) यांचे शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक,कामगार नेते,लेखक  कृष्णा मेणसे यांच्या त्या पत्नी होत.घरी येणाऱ्या  संयुक्त महाराष्ट्र लढा,गोवा मुक्ती आंदोलन आणि कामगार लढ्यातील कार्यकर्त्यांची विचारपूस,मदत आणि खाण्यापिण्याची सोय  विमल मेणसे मेणसे अत्यंत आपुलकीने करायच्या.निकटवर्तीयात त्या ताई म्हणून परिचित होत्या.विविध आंदोलनातील कार्यकर्त्यांना त्यांचा मोठा आधार वाटायचा. त्यांच्या पश्चात पती कृष्णा मेणसे,मुलगा प्राचार्य आनंद मेणसे,संजय ,दोन विवाहित कन्या,नातवंडे,पणतवंडे असा परिवार आहे.सायंकाळी साडेसहा वाजता सदाशिवनगर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी विविध संस्थांचे पदाधिकारी,लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

अवश्य वाचा