शासन निर्णय दि. २८ मे २०१९ नुसार व १५ वा वित्तआयोगाच्या निर्देशनानुसार "आमचा गाव आमचा" विकास उपक्रमाअंतर्गत मा. उप मुख्य कार्यकारी आधिकारी (ग्रा.पं.) रायगड  जिल्हा परीषद आलिबाग यांच्या सुचनेनुसार

पंचायत समिती श्रीवर्धन यांचेकडुन गणस्तरीय प्रशिक्षण व क्षमता बांधणी कार्यक्रमासाठी बोर्लीपंचतन, दिवेआगर, शिस्ते, भरडखोल, शेखाडी, वांजळे, कार्ले, खुजारे, ग्रामपंचायतीच्या सदस्य, शासकीय कर्मचारी व इतर सदस्यांची एक दिवसाची प्रशिक्षण कार्यशाळा शुक्रवार दिनांक ८/११/२०१९ रोजी रा. जि. प. प्राथमिक मराठी मुलांच्या शाळेच्या सरस्वती हॉल बोर्ली पंचतन  येथे आयोजित करण्यात आली होती. सदर कार्य शाळेत १५ व्या वित्त आयोगाच्या निर्देशनानुसार विविध विकासकामासंदर्भात योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले यावेळी श्रीवर्धन तालुका सभापती मा. सौ. मीना गाणेकर, उपसभापती श्री. बाबुराव चोरगे, बोर्ली पंचतन सरपंच सौ. नम्रता गाणेकर,दिवेआगर सरपंच श्री उदय बापट. विस्तार अधिकारी किशोर नागे व दिघीकर, ग्रामसेवक शंकर मयेकर,दिनेश रहाटे संबंधित ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक केंद्र प्रमुख,आरोग्य सेवक,अंगणवाडी सेविका, मुख्याध्यापक उपस्थित होते

अवश्य वाचा