बेळगाव,दि.८

             जम्मू येथे दशहतवाद्यांशी लढताना बेळगाव तालुक्यातील उचगावच्या सुपुत्रास वीरमरण प्राप्त झाले आहे.राहुल भैरू सुळगेकर (२२) रा.मारुती गल्ली, उचगाव असे हौतात्म्य  पत्करलेल्या जवानाचे नाव आहे.राहुल याच्या निधनाचे वृत्त कळताच उचगाव गावावर शोककळा पसरली असून गावातील व्यवहार बंद करून जनातेने आपल्या भावना व्यक्त केल्या.

              राहुल हा  चार वर्षांपूर्वी मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेन्टर मध्ये भरती झाला होता.बेळगाव येथे प्रशिक्षण पूर्ण करून तो जम्मू येथे सेवा बजावत होता.जम्मू येथे राहुल  चार मराठा युनिट मध्ये सेवा बजावत होता .गुरुवारी जम्मू येथे दशहतवाद्यांशी मुकाबला करताना त्याला गोळी लागून  वीर मरण प्राप्त झाले आहे.

               त्याच्या पश्चात  आई, वडील, भाऊ असा परिवार असून तो अविवाहित होता.त्याचे वडील भैरू सुळगेकर हे देखील सैन्यात सेवा बजावून  निवृत्त झालेत तर मोठा भाऊ मयूर सुळगेकर देखील सैन्यात   सेवा बजावत आहे.

शुक्रवारी रात्री  राहुल याचे पार्थिव बेळगावला येणार असून त्याच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. 

अवश्य वाचा

कलिंगडाची गोडी महागली