मोहोपाडा

 श्री समर्थ सामाजिक संस्था रसायनी व लोना इंडस्ट्रीज यांच्या वतीने आपटा येथील शिवसेना शाखेमध्ये आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेली एमजीएम हॉस्पिटल कामोठे तर्फे स्त्री रोग,बाळरोग,अस्तिरोग सर्जन,नेत्ररोग अशा तज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करुन त्यांना मार्गदर्शन करीत औषधोपचार दिले.त्याचप्रमाणे ब्लड ग्रुप,सीबीसी, थाइरॉइड,शुगर,एल.एफ.टी. एच.आय.व्ही.अशा रक्त तपासण्या करण्यात आल्या. या शिबिराचा 116 रुग्णांनी लाभ घेतला. कष्टाची कामे करत असताना आपल्या आरोग्यकडे दुर्लक्ष करणाऱ्या या समाज घटकाचे आरोग्य सुदृढ़ राहावे शिवाय काही महागडया रक्त तपासण्या मोफत करता याव्यात या उद्देशाने संस्थेचे अध्यक्ष रायगड भुषण- अरविंद पाटील गेली अनेक वर्ष या शिबिरांचे आयोजन करत आहेत.यावेळी आय.सी.टी.सी. चौक समुपदेशक अशोक लोंढे,महालब्स टेक्नीशन तृप्ति तांबडे,गणेश थोरवे,संजय अंबवने,मुसवीर सय्यद, शितल भोईर ,ऋतुजा अंबवने,काशीनाथ खुडे, अभी फूलमानी,सिद्धार्थ बारवेलकर,समीर भालेकर उपस्थित होते. या कार्यक्रमास  एमजीएम हाॅस्पिटलचे डॉक्टरपथक व शिवसेना शाखा आपटे येथील  कार्यकर्ते यांचे सहकार्य लाभले होते.या शिबिराचे आभार प्रदर्शन श्री समर्थ संस्थेचे अध्यक्ष अरविंद पाटील यांनी मानले.

 

अवश्य वाचा

कलिंगडाची गोडी महागली