नेरळ,ता.8

                        पर्यटनस्थळ माथेरान मध्ये पर्यटकांना पॉईंट व इतरत्र फिरविण्यासाठी घोडा हे प्रमुख वाहन असून त्या घोड्याची लिद सर्वत्र पडते त्यामुळे तिची बाधा पर्यावरणाला पोहोचते.ही गंभीर समस्या नगरपालिकेसमोर होती.पण ती सोडविण्यात नगरपालिकेला यश आले आहे.या लिदीची प्रक्रिया होऊन त्यापासून गॅस निर्मिती होण्यास सुरुवात झाली आहे.

                            माथेरान मध्ये एकूण 462 प्रवासी वाहन घोडे आणि 180 मालवाहू घोडे असून या घोड्यांची लिद सर्वत्र पडत होती.जरी नगरपालिकेने लीद उचलणारे कर्मचारी नेमून सुद्धा या लिदीची योग्य विल्हेवाट लागत नव्हती.ही लीद नगरपालिकेसमोर मोठी डोकेदुखी होती.त्याच वेळेस येथील कार्यतत्पर मुख्याधिकारी रामदास कोकरे आणि नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी या लिदीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी अनेक प्रयत्न केले.लिदीच्या दुर्गंधी पासून मुक्ती मिळविण्यासाठी कल्चर युक्त फवारणी करून दुर्गंधी मुक्त शहर केले.पण दररोज पडणाऱ्या लिदीमुळे शहर बकाल होत होत.त्याच वेळेस मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी लिदीपासून बायोगॅस हा प्रयोग आमलात येऊ शकतो का याचा अभ्यास सुरू केला व हा प्रयोग यशस्वी होताच येथील निसर्गऋण बायोगॅस प्रकल्पात लिदिसाठी स्वतंत्र प्रणाली अस्तित्वात आणली. माथेरान मधील सर्व विभाग,घोड्यांचे तबेले घोडे  उभे असणारे नाके येथून नगरपालिका कर्मचारयांमार्फत लिद संकलन करून ती बायोगॅस नेऊन त्या लिदीपासून गॅस उत्पत्ती करून त्यापासून माथेरान मधील महत्वाच्या रस्त्यावर वीज पुरवठा करण्यासाठी या गॅसचा उपयोग होत आहे.

                 ------ लिदीपासून गॅस ची प्रक्रिया कशी होते?

लिद संकलन केल्या नंतर ही लिद पाण्याच्या टाकीत टाकली जाते.पाणी आणि लिद यांचे मिश्रण तयार करून यामधून गवत बाजूला केले जाते.चांगल्या प्रकारे लिद मिश्रण झाल्यानंतर लिद मिश्रित पाणी हे प्री डायजेस्टर मध्ये सोडले जाते.त्यावर मिश्रणाची प्रक्रिया होऊन हे मिश्रण मेन डायजेस्टर मध्ये सोडले जाते.मेन डायजेस्टर मध्ये हे मिश्रण 24 दिवस राहून गॅस प्रक्रिया सुरू होऊन होत असलेला गॅस हा मेन डायजेस्टर मधून डोम मध्ये जातो आणि डोम मधून हळूहळू तो बलून मध्ये जमा होण्यास सुरुवात होते.

माथेरान मध्ये लिद ही समस्या खूप गहन होती.सहाशे च्या आसपास घोडे असल्याने साहजिकच घोड्यांची विष्टा म्हणजे लिद ही जास्त प्रमाणात पडणार पण तिची विल्हेवाट लावणे हे आमच्या समोर आव्हान होते.यासाठी लिदीपासून गॅस प्रक्रिया होते का याचा प्रयोग करून पाहिला.तो यशस्वी झाल्यानंतर स्टेनलेस स्टीलच प्री डायजेस्टर ची 12 फूट उंच टाकी बनवून तिच्यापासून प्रक्रिया सुरू केली एकावेळेस दीड टन लिद या प्री डायजेस्टर मध्ये राहते. त्यामुळे माथेरान आता लिदीपासून मुक्त होणार आहे.

                      रामदास कोकरे,मुख्याधिकारी

लिदीपासून गॅस बनविण्याची प्रक्रिया मुख्याधिकारी यांनी सांगितली ती योग्य असल्याने आम्ही सकारात्मक प्रतिसाद देत लिद मुक्त माथेरान करण्याचं आम्ही ठरवून आता लिदीपासून गॅस प्रक्रिया सुरू केली आहे.लिदीमध्ये उष्णता जास्त असल्यामुळे गॅस च प्रमाण वाढणार आहे.त्यामुळे रस्त्यावरील वीज पुरवठा व्यतिरिक्त येथील हॉटेल वाल्याना गॅस पुरवठा करून नगरपालिकेला उत्पन्न मिळेल यावर विचार चालू आहे .

                   प्रेरणा प्रसाद सावंत,नगराध्यक्षा

 

अवश्य वाचा

मोबाईल हिसकावून चोरटे पसार

गाडीची काच फोडून ऐवज लंपास