सुधागड-पाली दि.८ नोव्हेंबर २०१९

सुधागड आत बऱ्याच ठिकाणी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत रस्त्याला मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध झाला आहे परंतु त्या ग्राम सडक योजनेची कामे मृतावस्थेत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

सुधागडमध्ये खुरावले फाटा ते कुंभारघर, पेडली असरे नवघर कोंडगाव रस्ता नाडसुर विभागातील काही रस्ते अशा अनेक रस्त्यांना मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजुरी प्राप्त झाली आहे परंतु या योजनेचे पुढे काय झाले? याचा मात्र तपास लागत नसल्याचे दिसून येत आहे खुरावले ते कुंभारघर  या रस्त्याला मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत जवळपास 2 कोटी 78 लाख रुपये एवढा मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध झाला असून मात्र गेले चार-सहा महिने ही योजना मृतावस्थेत असल्याचे दिसून येत आहे. खुरावले फाटा ते कुंभारघर या रस्त्याच्या कामाला मार्च महिन्यात सुरुवात झाली असुल अध्याप दहा टक्के सुद्धा काम पूर्णत्वास आलेले नाही.पाऊसच्या  काळात लोकांना चिखलातून खड्ड्यातून वाट काढत प्रवास करावा लागला रस्ता खराब असल्याने या मार्गावरील वाहने पावसाळ्यात  तीन-चार महिने बंद करण्यात आली होती व त्याचा परिणाम शाळकरी विद्यार्थी वयोवृद्ध नागरिक आजारी व्यक्ती प्रवासी वर्ग यांना प्रवास करताना प्रवाशांच्या त्रासाला सामोरे जावे लागले गणपती सणात देखील गावकऱ्यांना तसेच मुंबई पुणे ठाणे येथील आलेल्या पाहुण्यांना खराब रस्त्याचा सामना करावा लागला परंतु सध्या पावसाचे प्रमाण कमी झाले असून रस्त्याच्या कामाला कोठेही सुरुवात झालेली दिसून येत नाही गणपती सणाप्रमाणे दिवाळीत देखील या खड्डेमय रस्त्यावरून प्रवास यांना प्रवास करावे लागले. अशा अवस्थेत रस्त्याचा संबंधित ठेकेदार या ठेकेदाराने एकदासुद्धा येऊन रस्त्याची पाहणी केल्याचे दिसून आले नाही असे असूनसुद्धा संबंधित रस्ते बांधकाम खाते याकडे दुर्लक्ष का करीत आहे असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे संबंधित ठेकेदाराकडून रस्त्याच्या कामाला सुरू होत नसेल तर त्वरित यांच्याकडून हे कंत्राट काढून घ्यावे अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ करत आहेत.

अवश्य वाचा

मोबाईल हिसकावून चोरटे पसार

गाडीची काच फोडून ऐवज लंपास