आगरदांडा

मुरुड पोलीस ठाणेचे  पोलीस उप निरीक्षक प्रशांत सुबनावळ यांच्या अध्यक्षतेखाली  पोलीस ठाणे हद्दीतील शांतता कमिटी , मोहल्ला कमिटी, दक्षता समिती, पोलीस पाटील तसेच विविध पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची ईद-ए-मिलाद व अयोध्या येथील निकाल  संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी मुरुड पोलिस उपनिरीक्षक- प्रशांत सुबनावळ ,  नगराध्यक्षा- स्नेहा पाटील , पोलीस नाईक- सुरेश वाघमारे , पोलीस हवालदार- लवटे ,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष- मंगेश दांडेकर , वासंती उमरोटकर, नगरपरिषद गटनेते-मुग्धा जोशी ,निलोफर, अतिक खतीब,  मनसे तालुका अध्यक्ष- शैलेश खोत , माजी अध्यक्ष- अरविंद गायकर , सागरकन्या मच्छीमारी सोसायटीचे अध्यक्ष- मनोहर बोले, उपाध्यक्ष- मनोहर मकु , समिर दैवनाक ,  इम्यिताज मलबारी ,नजीर फहीम, विजय पैैैैर,  आदिसह सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

मुरुड ठाणेचे उपनिरीक्षक- प्रशांत सुबनावळ यानी आलेल्या सर्वाचे पहिले स्वागत करून आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की काही  दिवसांतच अयोध्या राम मंदिर, बाबरी मशीद याविषयी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येणार आहे. हा निकाल कधीही येईल आणि तो काय आहे हे माहिती नाही. त्यामुळे निकाल काहीही लागला तरी सर्व धर्म, जातीच्या नागरिकांनी जातीय सलोखा राखावा. नागरिकांनी कोणतेही प्रक्षोभक वक्तव्य किंवा मेसेज पाठवू नयेत, काही चुकीचे संदेश दिले जात असल्याचे आढळल्यास त्याची माहिती पोलिसांना द्या,' असे आवाहन मुरुड  पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक- प्रशांत सुबनावळ  यांनी केले.तसेच 'सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल नागरिकांनी स्वीकारणे बंधनकारक आहे. निकालानंतर चांगल्या अथवा वाईट प्रतिक्रिया व्हॉट्स अॅप, फेसबुक अथवा इतर सोशल मीडियाद्वारे देऊ नयेत. कोणत्याही प्रकारे प्रक्षोभक वक्तव्य आणि पत्रकबाजी अथवा टीका करू नये. सोशल मीडियावर संबंधित निकालाच्या अनुषंगाने कोणत्याही धर्माच्या भावना दुखावतील अशा प्रकारचे संदेश प्रसारित करू नयेत.' 'निकालानंतर गुलाल उधळणे, फटाके वाजवणे, महाआरती अथवा समूहपठनाचे आयोजन करू नये. निकालानिमित्त पेढे, साखर अथवा मिठाई वाटणे, घोषणाबाजी करणे टाळावे. कोणत्याही जातिसमूहाच्या धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल,' असेही त्यांनी स्पष्ट केले. शांतता राखण्यासाठी पोलिसाची करडी नजर असणार आहे. शांतता कमिटी, दक्षता कमिटी, ज्येष्ठ नागरिक, पोलीसाना सहकार्य करावे अशी विनंती करण्यात आली.

यावेळी शांतता कमिटी , दक्षता कमिटी व आदिसह मान्यवरानी मत व्यक्त केले.

अवश्य वाचा

कलिंगडाची गोडी महागली