पाली / वाघोशी 

नागरीकांना  सवलतीच्या दरात प्रवास करणे आता अवघड झाले आहे वयाच्या 65 वर्षा वरील जेष्ट नागरीकांना एस टी महामंडळ अर्धा प्रवास शुल्क आकारत आहेत मात्र आता हे बंद होउन जेष्टांना स्मार्ट कार्ड दिले जाणार आहेत , राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून सवलतीच्या दरात प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना आता कागदी पासऐवजी महामंडळाकडून बँक व आधार क्रमांकाशी जोडलेले अत्याधुनिक 'स्मार्ट कार्ड' दिले जाणार आहे. त्यासाठीची नोंदणी प्रक्रिया पेन एस टी डेपो येथे व सुधागड येथे नोयेल चिंचोलकर यांच्या इथे  प्रायवेट  सुरू झाली असून, हे कार्ड देण्यासाठी  70 रुपये नाममात्र शुल्क घेतले जात आहे.

मात्र हे कार्ड मिळविण्या करीता  जेष्टनागरीकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे पुर्वी आधारकार्ड अथवा मतदान ओळखपत्र किव्हां वयाचा कुठलाही पुरावा असल्यास जेष्टांना सवलतीमध्ये प्रवास करता येत होता मात्र आता ते पुर्णपने बंद होउन स्मार्ट कार्ड ची सक्ती करन्यात आली आहे  हे स्मार्ट कार्ड मिळवीण्या करीता मोबाइल असने आवश्यक आहे मात्र सुधागड तालुका हा अर्थीक मागास तालुका व अदिवासी बहुल तालुका म्हणून ओळखला जातो तालुक्यातील सर्वच जेष्टांनकडे मोबाइल असेलच असे नाही ज्या नागरिकांकडे मोबाइल नसेल अश्यांना आता सवलतीच्या दरात प्रवास करने अवघड जानार आहे.

शासनानी केलेल्या या सक्तिमुळे जेष्ट नागरीकांच्यात नाराजी पसरली आहे . रायगड जिल्ह्यात स्मार्ट कार्ड  मिळविण्यासाठी 10 एप्रिल 2019 पासुन सुरवात झाली होती व 31 डिसेंबर 2019 रोजी मुदत संपणार आहे  त्यानंतर ज्यांच्या नोंदी नसतील त्यांनी काय करावे असा यक्ष प्रक्ष जेष्टांसमोर येवुन ठेपला आहे.  

आता 'डिजिटलायझेशन'च्या दिशेने वाटचाल करणाऱ्या एसटी प्रशासनाने कागदी पासऐवजी अत्याधुनिक स्मार्ट कार्ड देण्यास प्रारंभ केला आहे. या कार्डमध्ये बस पासधारकाचे नाव, सवलतीचा आणि बसचा प्रकार, प्रवासाचे अंतर, प्रवास सवलतीची मुदत आदी माहितीचा समावेश आहे. हे कार्ड संबंधित सवलतधारकाच्या आधार क्रमांकाशी जोडले जाणार आहे असे मिळेल.

 

 

 

 

 

 

अवश्य वाचा

मोबाईल हिसकावून चोरटे पसार

गाडीची काच फोडून ऐवज लंपास