चिपळूण 

मुंबई-गोवा महामार्गावरील शहरातील गटार व रस्त्याच्या नकाशा गुरुवारी नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध करण्यात आला. सकाळी ११ वाजता राष्ट्रीय महामार्ग उपविभाग कार्यालयात नकाशा पाहण्यासाठी महामार्गालगतच्या शेकडो नागरिकांसह सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी अर्ध्या फूटाच्या वर रस्ता व गगटाराची उंची वाढवू नये अशी एकमुखी मागणी केली. शहरातील गटारांची उंची अधिक असल्याने पावसाचे पाणी व सांडपाण्याचा प्रश्‍न निर्माण होणार आहे. यासंदर्भात नगरसेवक शशिकांत मोदी यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाला निवेदन दिले होते. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी  कार्यालयावर धडक देत शाखा अभियंता मराठे आणि उपअभियंता पवार यांना याबाबत जाब विचारला होता. तसेच रस्ते व गटारांचे नकाशा नागरिकांसमोर ठेवावे अशी मागणी केली होती. त्यानुसार नागरिकांसाठी हा नकाशा उपलब्ध करून देण्यात आला .नागरिकांनी रस्ता व गटारी उंची न वाढवण्याची मागणी केल्यानंतर उपअभियंता पवार आणि शाखा अभियंता मराठे यांनी नवीन नकाशाला मंजुरी घ्यावी लागेल असे सांगितले. पंधरा दिवसात याविषयी बैठक घेण्यात येणार असून गटाराची उंचीवर त्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. यावेळी शिवसेना क्षेत्रप्रमुख बाळा कदम, शिवसेना शहरप्रमुख उमेश सपकाळ, नगरसेवक शशिकांत मोदी,व्यावसायिक बापट,कदम यांच्यासह अनेक व्यावसायिक,  नगरसेवक मोहन मिरगल, संजय रेडीज ,नगरसेविका जयश्री चितळे, शिवसेना महिला संघटक रश्मी गोखले, राणी महाडीक, अवंतिका हरदारे, भाजपा उपनगराध्यक्ष निशिकांत भोजने, माजी नगरसेवक संजय तांबडे, किरण केळसकर आधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अवश्य वाचा

कलिंगडाची गोडी महागली