मुंबई 

‘क्रेझी किड्स कार्निव्हल’चे चौथे पर्व हे मुंबईतील मुलांसाठी यंदाचा सणासुदीचा काळ अधिक मोहक करून जाणार आहे कारण यंदा या महोत्सवामध्ये ‘बाल दिन’सुद्धा साजरा होणार आहे. ‘क्रेझी किड्स कार्निव्हल’चे आयोजन १६ आणि १७ नोव्हेंबर २०१९ दरम्यान मुंबईतील बांद्रे कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानावर सकाळी ११ ते रात्री १० दरम्यान केले गेले आहे. १ वर्ष ते १४ वर्षे वयोगटातील मुले ही या महोत्सवाचा आनंद त्यांच्या पालकांबरोबर घेवू शकतात. या महोत्सवामध्ये यापूर्वी अनेक महत्वपूर्ण अशा कार्यक्रमांचे आयोजन केले गेले होते आणि त्याद्वारे मुलांना आकर्षित व प्रोत्साहित करण्याचे काम केले गेले. ‘क्रेझी किड्स कार्निव्हल’ हा एक असा कार्यक्रम असतो जिथे लहान मुले आणि त्यांचे कुटुंब एकत्रितपणे उत्तम मनोरंजन साध्य करू शकतात. असे उद्गार मेल्टवॉटर इव्हेंट्सचे सह-संस्थापक नवीन टोडी यांनी काढले.

या महोत्सवामध्ये अनेक कार्यक्रम व खेळांचे आयोजन केले जाते आणि त्यात मुलांना भरपूर धमाल, मस्ती करता येते, तसेच त्यांच्यासाठी ती शिकण्याचीही एक संधी असते. या महोत्सावाचे आयोजन भव्य प्रमाणवर केले जाते आणि त्यात फ्ली मार्केट, अॅम्युजमेंट झोन, लाईव्ह शो, अॅडव्हेंचर झोन, ड्रम सर्कल आणि ट्राम्पोलीन पार्क यांचा समावेश असतो. त्यांचा आनंद पालकसुद्धा लुटू शकतात. त्याशिवाय या आयोजनाचा मुख्य आकर्षणबिंदू मुलांसाठी ‘मिट अँड ग्रीट कार्टून कॅरॅक्टर्स’ हा असून पालकांसाठी स्टँड-अप कॉमेडीचे आयोजन असेल.

 “या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुलांना कौशल्य शिकणे आणि विकास साधणे शक्य होणार आहे. ‘सायन्स लॅब’सारख्या संवादरूपी शोध केंद्राचा अनुभव प्राप्त करून देत मुलांना शास्त्राच्या माध्यमातून शिकत असताना धमाल-मस्ती करण्याची संधी मिळते. आज बरेच विद्यार्थी हे ऑनलाईन गेम्स खेळण्यावर भर देतात, अशावेळी त्यांना या आयोजनाच्या माध्यमातून मैदानी मस्तीचा एक अनुभव मिळू शकतो. अशाप्रकारचे अनुभव आज मुलांच्या आयुष्यात अभावानेच आढळतात,” असे उद्गार मेल्टवॉटर इव्हेंट्सचे सह-संस्थापक श्री निफुल जैन यांनी काढले. 

अवश्य वाचा