पाताळगंगा ८ नोव्हेंबर,

          रायगड जिल्हातील बोंबल्या विठोबा यात्रा म्हणून प्रसिद्ध असलेल्या साजगाव यात्रेस कार्तिकी एकादशी पासून प्रारंभ झाला असून तालुक्यासह जिल्हातील वारकरी संप्रदाय विठू रायाच्या चरणी लीन होण्यासाठी पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.विशेष म्हणजे काही दिंडी मध्ये बैल गाडीचा समावेश असून त्या बैलांना सजविण्यात आले होते.खालापूर तालुक्यातील तळवली गावातील वारक-यांनी पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले.ही पायी दिंडी माजगांव अंबिवली येथे येताच ग्रूप ग्राम पंचायत माजी उपसरपंच सरपंच राजेश ,पाटील मंगेश पाटील,काळूराम जाधव,राजेश ज.पाटील यांच्या  हस्ते या दिंडीचे स्वागत समारंभ करुन अल्प आहार देण्यात आले.यावेळी,नामदेव जाधव,वसंत जाधव,दीपक जाधव,राजेश जाधव,अक्षय जाधव,तसेच आंबिवली गावातील ग्रामस्थ बहुसंख्येने वारक-यांचे स्वागत करण्यासाठी उपस्थित होते मुखात हरीचे नाम टाळ,मृदुंग,यांच्या स्वरामध्ये ही दिंडी मजल -दरमजल करीत साजगावाच्या विठू रायाचे चरणी लीन होऊन या दिंडीनेविठु रायाचे दर्शन घेतले.

              कार्तिकी एकादशी च्या निनित्ताने लाखो भाविक भक्त तसेच वारक-यांनी या साजगांव येथिल विठू रायाचे दर्शन घेतले शेकडो वर्षाची परंपरा आजही या ठीकांनी जपली जात आहे.खोपोली -पेण रस्त्यावर ताकई गावाच्या हद्दीतील सुंदर मंदिर असून कार्तिकी एकादशी पासून सलग १५ दिवस यात्रेचे आयोजन खोपोली नगर पालिका  ताकई मंदिर देवस्थान कमिटी सयुक्त रित्या करण्यात येत असल्यामुळे यात्रेत पाणी व विजेची व्यवस्था खोपोली नगर पालिका करत असते.या यात्रेस साजगाव यात्रा असेही संबोधित केले जाते.यात्रेत कपडे ,घोंगडी ,खेळणी,मिठाई,सुकी मासळीचा व्यापार होत आहे.तर लाखो रुपयांची उलाढाल या यात्रेत होत असते.करमणुकीसाठी मौत कुआ,अकाश पाळणे,या सह अनेक साधने यात्रेत उपलब्ध असतात.

         कार्तिकी महिन्यामध्ये शेतीची कामे जवळ -जवळ पूर्ण झाली असतात.यामुळे शेतकरी आनंदित झाला असतो.शिवाय पैसेही जवळ असल्यामुळे अनेकजण या यात्रेस आवर्जुन जात असतात.पूर्वी प्रत्येक जण बैलगाडी घेऊन जात असे परंतू जसा काळ बदलला जातो.त्याच बरोबर माणूसही बदलत जातो.बैलगाडीची जागा आता अलिशान गाडी नी घेतली.यामुळे प्रत्येक जण खाजगी वाहन घेऊन जात आहे. 

            संत तुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली धाकटी पंढरी येथे संत तुकाराम महाराज घाटमाथ्यावरून मिरची व्यापार करण्यासाठी या परिसरात येत असत.परंतू मिरची विकल्यानंतर पैसे वसूल झाले नाही.तेव्हा तुकाराम महाराज यांनी विठ्ठलाच्या नावाने बोंब मारल्या तेव्हा पासून या विठ्ठलास बोंबल्या विठोबा असेही संबोधले केल्याची आख्यायिका आहे.तर सुक्या बोंबलांचा व्यापार मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे बोंबल्या ची जत्रा आशी बोलण्यांची परंपरा आहे.या पायी दिंडीचे आयोजन तुकाराम मालकर, जे.के.मालकर, तसेच ह.भ.प.मधुकर मालकर,दशरथ मालकर,संदेश मालकर ( ग्रूप ग्राम पंचायत वडगांव सद्स्य )भरत मालकर ,नथुराम गडगे,वैभव लभडे, देविदास मालकर,अमोल,प्रल्हाद, धृव, सागर,प्रकाश गणेश, तसेच शेकडो वारकरी या दिंडीत सहभागी होते.

अवश्य वाचा