खांब-रोहे,दि.८

    रायगड जिल्ह्यासह संपूर्ण रोहा तालुक्यामधील अध्यात्मिक व धार्मिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या स्वानंद सुखनिवासी गुरुवर्य अलिबागकर महाराज प्रेमवर्धक वारकरी सांप्रदाय मंडळ यांच्यावतीने ५० वर्षांच्या यशस्वी वाटचाली नंतर  रोहे शहरातील धाकटी पंढरी म्हणून संबोधली जाणा-या श्री संत गोरोबा नगर दमखाडी  येथील श्री.संत शिरोमणी गोरोबा काका मंदिर ते श्री क्षेत्र देवाची आळंदी पायी कार्तिक वारी दिंडी सोहोळ्याचे कार्तिक वद्य तृतीया गुरुवार दिनांक १४/११/२०१९ ते कार्तिक वद्य त्रयोदशी सोमवार दि.२५/११/२०१९ पर्यंत आयोजन करण्यात आले आहे.

     सालाबादप्रमाणे यंदाही पंढरीश परमात्मा पांडुरंग श्री विठ्ठल,संतश्रेष्ठ श्री.ज्ञानेश्वर महाराज, देहू निवासी जगद्गुरू श्री. संत तुकाराम महाराज आदी सकळ संतांच्या कृपाशीर्वादाने स्वानंद सुखनि वासी गुरुवर्य अलिबागकर महाराज,स्वानंद सुखनिवासी गुरुवर्य गोपाळ बाबा वाजे, गुरुवर्य धोंडू बाबा कोलाटकर ,दिंडी संस्थापक गुरुवर्य काशिनाथ बाबा मोरे, वै.महादेव महाराज महाबळे,यांच्या कृपेछात्रे खाली सदर दिंडी सोहळा संस्था संस्थापक रायगड भूषण हभप.दळवी गुरुजी महाराज यांच्या प्रेरणेने रायगड भूषण पुरस्कार प्राप्त मंडळाचे अध्यक्ष हभप. बाळाराम महाराज शेळके,रायगड भूषण हभप.नामदेव महाराज यादव,कोकण प्रांत अध्यक्ष तथा सल्लागार रायगड भूषण हभप.मारुती महाराज कोलाटकर यांच्या मार्गर्शनाने पायी वारी दिंडीचे अध्यक्ष प्रदीप महाबळे,उपाध्यक्ष ज्ञानेश्वर वाघमारे,सचिव सहादेव  महाडिक,खजिनदार अनिल सानप, उप खजिनदार महादेव महाबले,केशव म्हस्के,महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.सुजाता सुरेश म्हसकर, उपाध्यक्षा सौ. कुंदा ताई गोरे,खजिनदार सौ. सूर्वणा पांडुरंग मुंडे,  वासंती विजय सानप,सचिव ज्योत्स्ना योगेश यादव.दिंडीचे नेतृत्व सर्वश्री प्रख्यात गायनाचार्य रविंद्र मरवडे,हभप.वैभव खांडेकर,दत्ता कदम,राम दळवी,नितीन कचरे,मनोहर पाटील,राजेन्द्र म्हसकर,अमोल बिरवाड,रामकृष्ण नागावकर,धोंडू कचरे,दिनकर खांडेकर,सुमन दळवी,शोभा ताई शिर्के,अरूणा महाबळे,मंगल ढोकरे, कमल (अंकिता) सानप, हे करतील. तर या पायु दिंडी सोहळ्यातंर्गत विविध धार्मिक तथा अध्यात्मिक कार्यक्रम संपन्न होणार असून जास्तीत जास्त भाविकांनी या दिंडी सोहळ्यात सहभागी व्हावे अशाप्रकारचे अवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.

अवश्य वाचा

कलिंगडाची गोडी महागली