जेएनपीटी दि ६

'महा' चक्रीवादळ मुंबई आणि महाराष्ट्राच्या जवळ घोंघावत असून त्यामुळे येत्या काही दिवस समुद्रात उंच लाटा उसळण्याची शक्यता असल्याने उरण कडून जाणारी मोरा- भाऊचा धक्का ही लाँचसेवा व करंजा ते रेवस ही ‘तर’ सेवा शुक्रवार दिनांक ८ पर्यंत बंद करण्यात आली आहे.

हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या समुद्रात घोंघावत असून आज किंवा उद्या या चक्रीवादळाचा परिणाम राज्याच्या किनारपट्टी भागात दिसण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. दरम्यान, हवामान खात्याने समुद्रात तिन नंबरचा बावटा दाखविल्याने या दोनही जलवाहतूक सेवा बंद करण्यात आल्या आहेत. मोरा-भाऊचा धक्का ही लाँचसेवा आणि रेवस-करंजा ही तरसेवा बुधवार ता.06 सकाळ पासून बंद करण्यात आली आहे समुद्रातील वातावरण आणि महा चक्रीवादळाचा परिणाम कमी झाल्यानंतर ही जलवाहतूक पूर्ववत सूरू करण्यात येईल असे महाराष्ट्र मेरी टाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

या दोनही जलसेवा उरणकरांसाठी महत्वाच्या आहेत. रोज हजारो चाकरमानी आणि छोटे व्यावसायीक या जलमार्गावरून प्रवास करत असतात. ही जलवाहतूक बंद झाल्यामुळे या प्रवाशांची पंचाईत झाली आहे. मुंबई अलिबाग ही जलसेवा, मांडवा ते मुंबई ही जलसेवा देखलि  बंद झाली असल्याने अलिबाग येथिल व्यावसायीक आणि चाकरमानी त्यांचे हाल झाले आहेत. या  चक्रीवादळाचा धसका मच्छिमामारांनी देखिल घेतला असून शेकडो मच्छिमारी नौका किनाऱ्यांवार नांगरून ठेवल्या आहेत. चक्रीवादळाचा जोर ओसरल्यानंतर यालसेवा पूर्ववत सूरू होतील असे करंजा आणि मोरा येथिल बंदर अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

अवश्य वाचा

कलिंगडाची गोडी महागली