बेळगाव,दि.५

        शहापूर,वडगाव,येळ्ळूर, अनगोळ शिवारातील कापून ठेवलेली  भातपीकं  सोमवारी मध्यरात्री अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे  संपूर्ण भातपीकं पाण्यावर तरंगू लागल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

                पावसाने केलेल्या अवकृपेमुळे शेतकरी  आपल्या कुटूंबासहित शेतात कुदळ,फावडे घेऊन छोटे नाले काढून पाण्याचा निचरा करण्यातच पूर्ण दिवस मग्न  होते.या परिसरात बासमती,इंद्रायणी व इतर भातपीकं मोठ्या प्रमाणावर शेतकरी घेतात.मागील भयानक अतिवृष्टीमुळे या भागातील बळ्ळारी नाल्याला प्रचंड  पूर येऊन मोठे नुकसान झाले आहे.तसेच सुपीक जमीनीत आणी शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा बेकायदेशीर होत असलेला हालगा-मच्छे बायपासमूळे दोनवेळा पेरलेली पीकं वाया गेल्याने तिथला शेतकरी पीचला आहे.

            आता शेतकऱ्यांची उरलीसुरली पीकंही अलीकडचा पाऊस,सोसाट्याच्या वाऱ्याने जमीनदोस्त झाली,त्यावर करपा रोग पडून नुकसान झाले. कालच्या भयानक  पावसाने तर शेतकरी अक्षरशः वैतागलाय.नुकतीच भातकापणी सूरु होती.ती पीकं आज पाण्यावर तरंगू लागल्याने सारी शेतकरी कूटूंबच हादरुन गेल्याने शेतकऱ्याचे कष्ट आणि पैसा वाया गेल्यामुळे शेतकरी हादरलाय .

           अनेक छोटे शेतकरी खंडाने अथवा ठरलेल्या वार्षिक रकमेवर शेती करुन आपला उदरनिर्वाह चालवतात.कारण त्यांना दुसरा व्यवसाय जमत नाही म्हणून. आणी जर शासनाची नुकसानभरपाई आली तर ज्याच्या नावे सातबारा असतो त्याच्या बँक खात्यावर भरपाई जमा होते.पण खरा राबणारा आणी खर्च करणारा शेतकरी मात्र भरपाईपासून वंचीतच रहातो.तेंव्हा शासनाने कष्टकरी शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत मीळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करुन छोट्या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.अशी अनेक शेतकरी संघटनांची मागणी आहे.

अवश्य वाचा

मुरूड - अलिबाग बस नादुरुस्त...