बेळगाव,दि.५

  वायुदलाचे आधुनिकीकरण अत्यंत वेगाने होत आहे.आगामी काळात अत्याधुनिक विमाने,शस्त्रास्त्रे आणि संदेशवहन यंत्रणा हवाई दलात समाविष्ट होणार आहेत.त्यामुळे हवाई दलात सेवा बजावणाऱ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करावे लागणार आहे.एरोस्पेस तंत्रज्ञानात होणाऱ्या प्रगतीची ,संशोधनाची माहिती घेणे भविष्याच्या दृष्टीने महत्वाचे आहे असे उदगार भारतीय  वायू दलाच्या ट्रेनिंग कमांडचे एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ , एअर मार्शल ए. एस.बुटोला यांनी काढले.

  सांबरा येथील हवाई दलाच्या एअरमन ट्रेनिंग स्कुलला एअर मार्शल ए. एस.बुटोला यांनी भेट दिली.त्यावेळी अधिकारी आणि एअरमन याना मार्गदर्शन केले. दोन दिवसांच्या  भेटी दरम्यान त्यांनी ट्रेंनिग स्कुलच्या विविध विभागांना भेट देऊन पाहणी केली.बुटोला यांच्या हस्ते एक हजार प्रशिक्षणार्थींच्यासाठी उभारण्यात आलेल्या मेसचे आणि अत्याधुनिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे उदघाटन करण्यात आले.

  प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख एअर कमोडोर आर.रविशंकर यांनी बुटोला यांचे स्वागत केले.यावेळी हवाई योद्धयानी त्यांना मानवंदना दिली.बुटोला यांनी परेडचे निरीक्षण केले.

           बुटोला यांच्या पत्नी मोनिका बुटोला यांनी हवाई दलाच्या कर्मचाऱ्यांच्या पत्नीशी संवाद साधून त्यांच्या संघटनेच्या कार्याचे कौतुक केले.

 

अवश्य वाचा

कलिंगडाची गोडी महागली