५ नोव्हेम्बर २०१९ 

    महाराष्ट्रातील विधान सभा निवडणुकीच्या मतमोजणीस जवळ जवळ बारा तेरा दिवस उलटून गेले तरी अद्याप सरकार स्थापनेला उशीर होत असतानाच शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस आणि काही मित्र पक्षांच्या मदतीने राज्यात सरकार स्थापन करावे ही चर्चा जोर धरत आहे.खास.सुनिल तटकरे राजकारणात मुरब्बी असल्याने त्यांनी राजकारणात भल्याभल्यांना पाणी पाजून चारी मुंड्या चित करून राजकीय अनुभव आणि डावपेचाची चपराक सर्वानाच चांगल्या प्रकारे दाखवून दिली आहे.त्यात सुनिल तटकरे यांचे वरीष्ठ नेत्यांशी असलेल्या घनिष्ठ संबंधाने मर्जी संपादन केली आहे.नवनिर्वाचित आम.आदिती तटकरे यांनी लहान पणापासूनच आजोबांच्या,वडिलांच्या आणि भावाच्या सहवासात राहून राजकारणातले अनेक डाव सहजपणे उलथून लावले असून गेल्या अडीच वर्षांचा त्यांचा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा कार्यकाल निश्चितपणे वाखाणन्यासारखा आहे त्यामध्ये त्यांच्या नशिबी असलेला राजयोग.सध्या जिल्ह्यातील सात पैकी तीन सेना,तीन भाजपा आणि एकमेव श्रीवर्धन विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे आमदार म्हणून आहेत.बाकी सहाच्या आमदारांनी मंत्रीपदासाठी आपापल्या परीने फिल्डिंग लावून आहेत.मात्र शिवसेना,राष्ट्रवादी कांग्रेस,काँग्रेस आणि मीत्र पक्षाचे सरकार महाराष्ट्रात स्थापन झाले तर आदिती तटकरेंना मंत्रिमंडळात निश्चित पणे स्थान मिळेल अशी संपूर्ण जिल्ह्यात सुरु आहे.

अवश्य वाचा

कलिंगडाची गोडी महागली