खेड 

दिव्यांग क्रिकेट असोशिएशन रत्नागिरी व प्रहार अपंग क्रांती आंदोलन, रत्नागिरी जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने १० नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता आझाद मैदान, दापोली येथे दिव्यांग महिला व पुरूष खेळाडू यांची जिल्हास्तरीय क्रिकेट निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे.

रत्नागिरी जिल्हयातील दिव्यांग महिला व पुरूष खेळाडूंना क्रीडा क्षेत्रात खेळण्याची संधी मिळावी या करीता निवड चाचणी शिबिरात सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. खेळाडूंनी येताना अपंगत्वाचे प्रमाणपत्र,आधारकार्ड (झेरॉक्स) शाळेचा दाखला अथवा बोनाफाईड प्रमाणपत्र, पासपोर्ट साईज २ फोटो घेऊन येणे, निवड झालेल्या खेळाडूंचा महिला व पुरूष संघ ३ डिसेंबर रोजी पुणे येथे होणा-या राज्यस्तरीय दिव्यांग क्रिकेट स्पर्धेत रत्नागिरी जिल्हयाचे प्रतिनिधीत्व करणार आहे. तरी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन दिव्यांग क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष राष्ट्रीय खेळाडू प्रशांत महेंद्र सावंत यांनी केले आहे.

अवश्य वाचा

मोबाईल हिसकावून चोरटे पसार

गाडीची काच फोडून ऐवज लंपास