अलिबाग 

रायगड जिल्हा रुग्णालयातील डायलेसीस विभाग प्रमुख डॉ.दिपाली देशमुख यांचे सोमवारी सकाळी 10.45 वाजता पुणे येथील दिनानाथ हॉस्पिटल मध्ये निधन झाले. निधन समयी त्याचे वय 48 होते. स्व.डॉ.दिपाली देशमुख यांच्या मागे पती डॉ.वैभव देशमुख, पुत्र अन्शूल व अनिश, सासूबाई डॉ.हेमा देशमुख, सासरे डॉ.प्रभाकर देशमुख असा परिवार आहे. 

स्व.डॉ.दिपाली देशमुख यांनी वैद्यकीय क्षेत्रातील एमबीबीएस पदवी गर्व्हमेंट मेडिकल कॉलेज नागपूर येथून संपादन केल्यावर पूढील शिक्षण पुण्यातील सिम्बॉयसीस कॉलेज मध्ये पुर्ण केले. अलिबाग मधील ज्येष्ठ बालरोग तज्ज्ञ डॉ.वैभव देशमुख यांच्याशी विवाहबद्ध होवून अलिबाग मध्ये आलेल्या स्व.डॉ.दिपाली देशमुख या रायगड मध्ये समरस झाल्या हाेत्या.

गेली 12 वर्ष त्या येथील जिल्हा सरकारी रुग्णालयातील डायलेसिस यूनीटच्या प्रमुख म्हणून कार्यरत होत्या. त्यापूर्वी त्या याच रुग्णालयात वैद्यकिय अधिकारी म्हणून सेवाभावी वृत्तीने कार्यरत होत्या. अलिबागच्या कोएसो मेडिकल कॉलेज मध्ये त्यांनी व्याख्यात्या म्हणून देखील काम केले होते.

दरम्यान गेल्या तिन वर्षांपूर्वी त्यांना ब्लड कॅन्सर या दूर्धर आजाराने ग्रासले. प्रचंड जिद्द आणि ईच्छा शक्ती व वैद्यकीय उपचार याच्या जोरावर त्या त्यातून बाहेर पडून पुन्हा आपल्या कर्तव्यावर रुजू होवून डायलेसीस युनीट प्रमुख पदाची जबाबदारी अत्यंत आत्मविश्‍वासाने सांभाळत होत्या. परंतू दूर्दैवाने त्यांना दुसर्‍यांदा याच आजाराने ग्रासले आणि अखेर सोमवारी सकाळी 10.45 वाजता उपचार सुरु असतानाच त्यांची प्राणज्योत मालविली. सायंकाळी उशिरा श्रीबाग येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

 

अवश्य वाचा

कलिंगडाची गोडी महागली