रोहे,दि.४

       रायगड जिल्ह्यातील डॉक्टरांची सक्रीय संघटना असलेल्या रायगड मेडीकल असोसिएशनची पहीली जिल्हास्तरीय मॅरेथॉन येत्या १७ नोव्हेंबर रोजी रोह्यात होणार असुन या साठी जय्यत तयारी सुरु आहे .

         नोव्हेंबर महिन्यात थंडीची सुखद चाहूल लागलेली असते त्यामुळे वातावरण आल्हाददायक असते त्यातच निसर्ग  धुक्याची शाल पांघरून घेत असल्यामुळे निसर्ग सौंदर्याने नटलेल्या परिसरात होणाऱ्या या मॅरेथॉन मध्ये सहभागी होण्याचा एक विलक्षण आनंद सहभागी स्पर्धकांना मिळणार आहे .रोह्याच्या निसर्गसुंदर अशा डोंगराळ भागात हा इवेंट होत असल्यामुळे या मॅरेथॉन बद्द्ल जिल्ह्यातील डॉक्टरांमध्ये कमालीची उत्सुकता आहे .

     रोह्यात अनेक उपक्रमांचे यशस्वी नियोजन करणाऱ्या रोटरी क्लब रोहा सेंट्रल कडे या इवेंटचे पूर्ण नियोजन असुन त्यांनी या उपक्रमासाठी विशेष नियोजन केले आहे .

       रायगड मेडीकल असोसिएशन तर्फे प्रेसिडेंट डॉ .देवेंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली व मॅरेथॉनचे चेयरमन जिल्ह्यातील सुप्रसिद्ध ह्रुदयरोगचिकित्सक डॉ .अशोक जाधव यांच्या पुढाकाराने व जिल्ह्यातील सर्व आर .एम .ए .सदस्यांच्या विशेष सहकार्याने हा महत्त्वाकांक्षी इवेंट संपन्न होत असुन जिल्हा केमिस्ट असोसिएशन , एम .आर .असोसिएशन , लॅब असोसिएशन या वैद्यकिय क्षेत्राशी संबंधित घटकांनाही या मॅरेथॉन मध्ये सहभाग घेण्याची संधी देण्यात येणार आहे .तसेच हा इवेंट रोहा येथे संपन्न होत असल्यामुळे रोह्यातील प्रथम नोंदणी करणाऱ्या काही ठराविक हौशी धावपटूंना या मॅरेथॉन मध्ये सहभागी होण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे .

      आर .एम .ए .तर्फे प्रथमच अशा प्रकारच्या मॅरेथॉनचे नियोजन करण्यात येत असल्यामुळे जिल्ह्यातील डॉक्टरांमध्ये या उपक्रमाविषयी औत्सुक्य असुन रायगड मधील नामवंत डॉक्टर्स या निमित्ताने रोह्यात धावताना दिसणार आहेत .३,५,१० आणि २१ किलोमीटर साठी ज्या रोहेकर नागरिकांना आपला सहभाग नोंदवायचा आहे त्यांनी श्री गजानन मेडीकल (९८६०९५७५००)सुमन नेत्रालय (७०३८९४५९७३)आदित्य मेडीकल (९१५८५०६०५४) येथे लवकरात लवकर सम्पर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे , प्रथम येणाऱ्या काही मर्यादित रोहेकरांनाच या इवेंट मध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे .

अवश्य वाचा

कलिंगडाची गोडी महागली