खांब-रोहे,दि.४

       ताडमाळ आदिवासी जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांनी कराटे तायक्वाँनदोमध्ये यलो बेल्ट मिळवून सुयश संपादित केले आहे.

       ताडमाळ आदिवासी जि.प.शाळा ताडमाळ, आणि रविरत्न तायकांदो आणि मार्शल आर्ट असोसिएशन यांचा यलो ,आॕरेंज आणि ब्लॕक बेल्ट कराटे कॕम्प बापूजीदेव मंदिर ,सावारसई पेण  येथे निसर्गरम्य वातावरणात संपन्न करण्यात आला.यावेळी ताडमाळ अदिवासी जि. प. शाळा, येथील विध्यार्थ्यानी विविध कराटे प्रकार दाखवत प्रथम बेल्ट मिळवला आहे .या शाळेचे शिक्षक शिवाजी माने हे स्वत. ब्लॅक बेल्ट प्रशिक्षक असुन त्यांनी सावरसई ता. पेण येथे भरवण्यात आलेल्या दोन दिवसीय बेल्ट एक्सामिनिशन्स कँम्पमधे  राजेश म्हात्रे पेण यांच्या सहकार्याने आपल्या एकूण १४ विध्यार्थान्ना सहभागी करून यश संपादित केले आहे. त्यांच्या सुयशाबद्दल अभिनंदन होताना दिसत आहे. तर दि. २ व ३ नोव्हे या दोन दिवसीय कॕम्प मध्ये विविध प्रकारचे  प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये एकूण ३० प्रशिक्षणार्थ्यानी सहभाग घेतला व त्यांनी अनेक  प्रात्यक्षिके करून दाखवली.या कॕम्प साठी रविरत्न तायकांदो चे अध्यक्ष  रविकर मोराळे व उपाध्यक्ष शंकर गायकवाड उपस्थित होते.प्रशिक्षक म्हणून  पांडुरंग कदम (मुंबई पोलिस),  शिवाजी माने, कैलास बोराडे,रोशन सर, सुरज सर, अमरीश सर, हिरु सर यांनी  खुप मेहनत घेतली .या कार्यक्रमा साठी प्रमुख पाहूणे म्हणून हिराजी पाटील,राजेश म्हात्रे, दिलिप म्हात्रे आणि  ऋषिकेश महाडीक आदि उपस्थित  होते.

 

अवश्य वाचा

कलिंगडाची गोडी महागली