नायगाव, मुंबई.

      मुंबई शहर जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा-२०१९.

     पावसामुळे मुंबईची निवड कबड्डी स्पर्धा पुन्हा एकदा पुढे ढकलली. ११नोव्हे. पासून होणार पुन्हा सुरू.

     मुंबई शहर कबड्डी असो.च्या वतीने व मुंबई शारीरिक शिक्षण मंडळ पुरस्कृत “जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा” पुन्हा एकदा पावसाच्या अनिश्चितीमुळे पुढे ढकलण्यात आली. दसऱ्यानंतर सुरू झालेली ही स्पर्धा दिवाळीपूर्वी पावसामुळेच रद्द करावी लागली होती. ४ नोव्हेंबरला ही स्पर्धा सुरू होणार होती, पण वेधशाळेने केलेल्या भाकितानुसार मुंबई शहर कार्यकारणी मंडळाला हा निर्णय ध्यावा लागला. 

    आता ही स्पर्धा ११ नोव्हेंबरपासून खेळविण्यात येईल. याकरिता स्पर्धेची नवीन कार्यक्रम पत्रिका तयार करण्यात आली असून, लवकरच ती सर्व सहभागी संघाना हस्तेपरहस्ते मिळेल याची काळजी घेण्यात येईल. आपल्या काही अडचणी असतील किंवा आपल्या सामन्या संबधी विचारणा करावयाची असेल तर रविवार व सुट्टीचे दिवस वगळून संघटनेच्या कार्यालयात सायंकाळी ६-३० ते ८-३० या वेळेत संपर्क साधावा. असे आव्हान संघटनेचे सचिव विश्वास मोरे यांनी या परिपत्रकाद्वारे केली आहे.

    

अवश्य वाचा

कलिंगडाची गोडी महागली