सांगोला

सांगोला तालुक्यातील चौफेर विकासापासून अद्यापही दूर असणाऱ्या डिकसळ गावा पासून जाणाऱ्या मंगळवेढा-जत रोडवर वाढत्या खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठ्याप्रमाणात कसरत करुन ये-जा करावी लागत आहे. पावसाच्या पाण्यामुळे भरलेले खड्डे रस्त्यावरील "मौत का कुआ' बनले आहे. बांधकाम विभागाकडून रस्त्याची वेळोवेळी पाहणी व तपासणी केली जात नसल्यामुळे बांधकाम विभागाचा हा अजब कारभार नागरिकांच्या जीवाशी खेळ करणारा असल्याचा संताप नागरिकां बरोबरच मोटारसायकल चालकांमधून व्यक्त केला जात आहे.

तालुक्यातील बहुतांशी लोक जत, विजापूर व कर्नाटक राज्याकडे जाण्यासाठी जवळा-घेरडी मार्गे डिकसळ फाटा येथून पुढे जतकडे जाण्याचा जवळचा व सोपा मार्ग म्हणून या रस्त्याचा वापर करतात. त्याचबरोबर कर्नाटक व जत तालुक्यातील नागरिक सांगोला शहरातील आठवडा बाजारासाठी डिकसळ, पारे, जवळा आदि गावातही विविध कामा निमित्त ये-जा करण्यासाठी मंगळवेढा-जत जो सांगोला तालुक्यातील डिकसळ गावाच्या हद्दीतून जातो. या रस्त्यावर गेल्या काही वर्षापासून वाहन धारकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

पंढरपूर येथे वारीसाठी येणारे भाविकही जत-मंगळवेढा-पंढरपूर या मार्गाने ये-जा करतात. मोटार सायकल चालकांची संख्या या रस्त्यावर प्रचंड आहे. तालुक्यापासून हा भाग 30 ते 35 कि.मी.दूर असल्यामुळे गावातील व वाड्या-वस्त्यावरील लोक या रस्त्याचा वापर करतात. परंतु डिकसळ फाट्यापासून जवळूनच वाहत असलेल्या नाल्यावर जुना छोटासा पूल आहे. हा पूल नावालाच पूल बनला असून पूलावरील खड्ड्यांमुळे सदरचा पूल हा मृत्यूचाच पूल बनला असल्याचे ये-जा करणाऱ्या नागरिकांमधून बोलले जात आहे. पावसाचे दिवस असल्यामुळे रस्त्यावरील बहुतांशी खड्ड्यात पाणी साचले असल्यामुळे रस्ता व रस्त्यातील खड्ड्यांचा अंदाज सहजासहजी येत नाही.

नाल्यावरील पडलेला मोठा खड्डा रात्री-अपरात्री कधी कोणाचा बळी घेईल हे सांगता येत नाही. त्यामुळे संबंधीत बांधकाम विभागाने तात्काळ रस्त्यावरील पडलेलेल्या मोठ-मोठ्या खड्ड्यांची चांगली डागडोजी करावी तसेच वेळोवेळी रस्त्याची पाहणी करावी. किमान पावसाळ्याच्या दिवसात तरी रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचणार नाही. याची दक्षता घेणे अपेक्षित आहे अन्यथा रस्त्यावर पडलेलेल्या महाखड्ड्यांना शेततळे घोषित करुन मच्छपालन करावे.

अवश्य वाचा