अलिबाग 

परतीच्या पावसाने रायगड जिल्ह्यातील शेतीचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्याचे तातडीने नुकसानीचे पंचनामे करून 100%  नुकसान भरपाई देऊन दिलासा देण्यात यावा अशी मागणी शेकापक्षाचे नेते पंडीत पाटील यांनी केली आहे.

रायगड जिल्ह्यातील शेतकरी परतीच्या पावसाने पुरता उध्वस्त झाला आहे. याबाबत शेकाप नेते पंडित पाटील यांनी कृषीवलजवळ संपर्क साधून शेतकर्‍यांना 100 टक्के नुकसान भरपाई मिळण्यासाठी आपण शासनाकडे मागणी करणार असल्याचे सांगितले. कोकणातील शेतकर्‍याला नुकसान भरपाई दिली जात नाही. इथल्या शेतकर्‍यांना पैसे मिळत नसल्यामुळे शासनाने निकष बदलले पाहिजेत अशी मागणीही पंडीत पाटील यांनी केली आहे.

दिवाळीच्या सुट्टीसाठी कृषी विभाग तसेच इतर विभागाचे अधिकारी रजेवर असल्याने पंचनामे पुर्ण होण्यास अडर्चीी निर्माण होत असल्याने शासनाने त्यांना तातडीने उपस्थित राहण्याचे आदेश देऊन सव नुकसानीचे पंचनामे करुन नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना 100 टक्के मदत करण्याची गरज आहे.

 

अवश्य वाचा

कलिंगडाची गोडी महागली