परतीचा पाऊस व क्यार वादळाने शेतकऱ्याचे झालेले अतोनात नुकसान  व त्यामुळे अडचणीत सापडलेला शेतकरी यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी श्रीवर्धन तहसीलदार   यांनी भातशेतीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. दिवेआगर परीसरातील तयार झालेले भातपीक पुर्णपणे पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान याची माहीती घेण्यासाठी दिवेआगरचे कार्यतत्पर सरपंच श्री. उदय बापट यांनी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली व झालेल्या नुकसानीची माहीती घेतली. यावेळी परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेले पीक संपुर्णपणे वाया गेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांवर  उपासमारीची पाळी येणार आहे तसेच उन्हाळ्यात गुरांच्या चा-याअभावी गुरे कशी जगवायची हा प्रश्नसुध्दा शेतकऱ्यांना पडला आहे त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था खुपच बिकट बनली आहे त्यांना या अवस्थेत आधार मिळावा म्हणून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन ते श्रीवर्धन महसुल विभागाकडे पाठवीण्यात आले यावेळी सरपंच उदय बापट यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले की आपल्या भात, नाचणी, वरी या पीकांचे जे काही नुकसान झाले असेल त्यांनी ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक,यांच्याशी संपर्क साधुन लवकरात लवकर आपल्या नुकसानीचे पंचनामे करुन घ्यावे सदर पंचनाम्यासाठी ग्रामसेवक श्री. शंकर मयेकर, दिवेआगर तलाठी सजाचे कोतवाल गणेश महाडीक,शेतकरी व ग्रामस्थ उपस्थीत होते.

 

अवश्य वाचा

कलिंगडाची गोडी महागली