३१ ऑक्टोम्बर २०१९

नुकत्याच संपन्न झालेल्या विधानसभा निवडणुकीत 193 श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात युतीचे उमेदवार विनोद घोसाळकर यांचा 39 हजार पेक्षा जास्त मताधिक्याने पराभव करून आघाडीच्या उमेदवार आदिती तटकरे यांनी विजय मिळविला आहे. दि.30 रोजी मुंबईत आयोजित विधिमंडळ नेता निवडीच्या सभेत राज्यभरातील निवडून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी श्रीवर्धन मतदारसंघाच्या नवनिर्वाचित आमदार आदिती तटकरे यांचा पक्षाचे सर्वेसर्वा राष्ट्रीय अध्यक्ष श्री.शरद पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सभेत पक्षाचे विधिमंडळ नेते पदी माजी उपमुख्यमंत्री तथा आमदार अजितदादा पवार यांची निवड करण्यात आली.

आयोजित सभेला राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, माजी उपमुख्यमंत्री आ.छगन भुजबळ, खासदार सुप्रिया सुळे, खासदार सुनिल तटकरे, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार डॉ.अमोल कोल्हे, आमदार धनंजय मुंडे, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार दिलीप वळसे पाटील, आमदार रोहित पवार, आमदार आदिती तटकरे यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे इतर आमदार उपस्थित होते.

अवश्य वाचा

मोबाईल हिसकावून चोरटे पसार

गाडीची काच फोडून ऐवज लंपास