रायगड(धम्मशील सावंत ) अतिवृष्टी व परतीच्या पावसाने जिल्ह्यात दीड हजार गावामधील १० हजार हेक्टर क्षेत्रावरील भातशेतीचे मोठे  नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास गळून पडल्याने शेतकरी हताश झाला आहे. पुढे काय होणार या विचाराने  शेतकरी हवालदिल झाला आहे. शासनाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन शेतकर्‍यांना नुकसानभरपाई द्यावी तसेच रायगड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी महत्वपूर्ण मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी  केली. ऐन दिवाळीच्या सणात शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आले आहे. आस्मानी व सुलतानी संकटाने शेतकरी व्याकुळ झाला आहे. मायबाप सरकारने सरसकट पंचनामे करावेत अशी मागणी नुकसानग्रस्त सुधागड सह जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.

 एकेकाळी भाताचे कोठार म्हणून ओळखल्या जाणार्‍या रायगड जिल्ह्यातील शेती व शेतकरी आता खुप मोठ्या नैसर्गीक संकटात सापडला आहे. सातत्याने नैसर्गीक आपत्तीचा शिकार होत असलेल्या शेतकर्‍याला मायबाप सरकारने आधार देणे गरजेचे आहे. असे बाळाराम काटकर म्हणाले. शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे शाशन प्रशासन ढुंकूनही बघत नाही. नुकसानी ची भरपाई देणे दूरच राहिले.  शेतकऱ्याला न्याय देण्यात सरकार कमी पडले तर कोकणातील शेतकरी देखील आत्महत्या करताना दिसतील अशी भीती पांडुरंग तेलंगे यांनी व्यक्त केली.  अतिवृष्टीने गुरांचा चारा देखील नष्ट झाला आहे. किडीचा प्रादुर्भाव झाल्याने पिकाची नासाडी झाली आहे. तहसिल, कृषी विभाग यांनी संयुक्तिक पाहणी करून पंचनामे करावेत अशी मागणी जोर धरत आहे.

 ऐंन कापणीच्या तोंडावर आलेल्या परतीच्या  पावसाने शेतकर्‍याच्या डोळ्यात पाणी आणले आहे. भातशेती कापणीच्या अंतिम टप्प्यात असल्याने परतीच्या पावसाने भातशेतीचा घात केला आहे. येथील शेतकर्‍यांच्या उदरनिर्वाहाचे मुख्य साधन शेती असून वर्षभर शेतकर्‍याच्या कुटुंबाचे पोट शेतीतून निघणार्‍या उत्पादनावरच अवलंबून असते. मात्र अतिवृष्टीने व परतीच्या  पावसाने उभे पिक शेतात आडवे झाले. तर अनेक ठिकाणी कापलेल्या पिकांची नासाडी झाली. परिणामी येथील शेतकर्‍यांच्या हातोंडातील घास गळून पडल्याने शेतकरी चिंतातूर व व्याकुळ झाला आहे. . यंदा पावसाने बर्‍यापैकी कृपादृष्टी ठेवल्याने शेतात चांगलेच पिक बहरले होते. दसरा दिवाळीत शेतकरी भातकापणीचे नियोजन करीत होता. काही ठिकाणी भातकापणीचे जोरात काम सुरुही झाले होते. कापणी केलेल्या भाताची नासाडी झाली आहे.  यंदा भाताला बाजारात चांगला भाव मिळेल या आशेवर आसलेल्या शेतकर्‍याचा आता हिरमोड झाला आहे. परतीच्या पावसाने शेतकर्‍यावर आस्मानी संकट ओढवल्याची परिस्तीती निर्माण झाली आहे. संपूर्ण जिल्ह्यातील भातशेती परतीच्या पावसामुळे धोक्यात आली आहे. परतीच्या पावसामुळे भातपिकाचे मोठेनुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. उत्पादनात घट होणार असल्याने शेतकर्‍यापुढे मोठे संकट उभे ठाकले आहे. या आस्मानी संकटाने शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी  आले असून शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे ठाकले आहे. यंदा पावसाने मोठ्याप्रमाणावर नुकसान केल्याने सुरवातीपासून आजतागायत झालेला किमान खर्च तरी निघेल का? की दरवर्षीप्रमाणे गतवर्षीही डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहणार या भितीने शेतकरी हवालदिल झाला 

आहे. जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी जगला तरच  आपण सर्वांना जगता येईल अन्यथा भयावह परिस्थिती ला सामोरे जावे लागेल असे  शरद गोळे या शेतकऱ्यांने  सांगितले. 

दरम्यान जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पांडुरंग शेळके यांनी सांगितले की रायगड जिल्ह्यात परतीच्या पावसाने भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. १ सप्टेंबर २०१९ च्या शासन निर्णयानुसार पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याचे काम सुरू आहे. परतीच्या पावसाने भातशेतीचे मोठे नुकसान झाले. याचा देखील सकारात्मक विचार केला जाईल.

अवश्य वाचा

कलिंगडाची गोडी महागली