मुंबई, २५ ऑक्टोबर

काल विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आहेत आणि राज्यातील जनतेने आपला कौल दिला आहे. कालच्या निकालातून जनतेने भाजपचा सत्तेचा अहंकार उतरवला आहे. स्वबळावर सत्ता स्थापन करण्याची वल्गना करणाऱ्या भाजपच्या नेत्यांना आता जनतेने जमिनीवर आणले आहे . शिवसेनेच्या जागा ही कमी झाल्या आहेत . मात्र शिवसेने शिवाय सरकार बनविणे शक्य नाही . आम्हाला जर शिवसेनेकडून सरकार बनविणेबाबत अधिकृत प्रस्ताव आल्यास हायकमांडशी चर्चा करू असं आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत सांगितले  .

भाजपने सत्ता पैसा आणि यंत्रणाचा गैरवापर करून विरोधी पक्षांच्या नेत्यांना पक्षांतर करायला लावले पण जनतेने या सर्व आयाराम गयारामांचा पराभव करून भाजपच्या सत्तेच्या मग्रुरीला चाप लावला आहे. महाराष्ट्राच्या जनतेला गृहीत धरू नका, ऊत मात करू नका हा संदेश जनतेने या निकालातून दिला आहे. या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या महाआघाडीने चांगले यश मिळवले आहे.

 महाआघाडीला मिळालेले यश

काँग्रेस – ४४

राष्ट्रवादी काँग्रेस – ५४

बहुजन विकास आघाडी – ३

समाजवादी पक्ष – २

शेतकरी कामगार पक्ष – १

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष – १

स्वाभिमानी शेतकरी संघटना – १

रवि राणा - १ आणि

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष - १०  

असे मिळूण जवळपास ११७ उमेदवार निवडून आलेले आहेत.

विरोधी पक्ष पूर्वीपेक्षा ताकदवान झालेला आहे.

विरोधी पक्षाच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत प्रचंड कष्ट घेतले.

विरोधी पक्ष पूर्वीपेक्षा ताकदवान झालेला आहे.

विरोधी पक्षाच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत प्रचंड कष्ट घेतले.

आम्हाला अपेक्षित यश मिळाले नाही .या पेक्षा जास्त जागा निवडून येतील असे नियोजन केले होते.

आम्ही नियोजन पूर्वक प्रचार केला .काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी राज्यात ५ सभा घेतल्या , मी स्वतः ४८, मल्लिकार्जुन खर्गे यांनी १३, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी १२, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ५, राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी ४, ज्योतिरादित्य सिंधीया यांनी ५, शत्रुघ्न सिन्हा यांनी ५, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक यांनी 28, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी १५, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व गुजरातचे प्रभारी राजीव सातव यांनी १२, खा. हुसेन दलवाई यांनी १६ सभा घेतल्या आमच्या इतर नेत्यांनीही सभा आणि पदयात्रा केल्या.

· युवक कॉंग्रेस – सुपर सिक्स्टी

· महिला कॉंग्रेस – जनसंपर्क अभियान

·  सेवादल – संपर्क अभियान

·  रामहरी रुपनवर – ५० सभा , सर्वच सेल कार्यरत राहिले

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यभराच जोरदार प्रचार केला, त्यांच्या अनुभवाचा आम्हालाही फायदा झाला.  काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांच्या सर्व नेते व कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेऊन आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणले या सर्व कार्यकर्त्यांचे मी आभार मानतो.

आगामी काळात राज्यातील जनतेच्या ज्वलंत प्रश्नांसाठी आम्ही ताकदीने लढू. आमच्या १९ जागा १०००० पेक्षा कमी मताने हारल्या,  नागपूर शहर कॉंग्रेसच्या पाठीशी खंबीर पाने उभे राहिले, आम्ही तेथे दोन जागा जिंकलोय आणि २ जागा आम्ही अवघ्या ५ हजार मताने हरलोय. 

मुंबईसह शहरी भागात अपेक्षित यश मिळाले नाही. तिथे आम्ही जास्त प्रयत्न करू, संघटन मजबूत करू, पाच वर्षात नवी काँग्रेस उभी करू असं ही आमदार बाळासाहेब थोरात यांनी पत्रकारांना सांगितले