मुंबई

नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना दाऊदचा हस्तक असलेले आमदार पुरूषोत्तम सोलंकी १५ वर्षे मंत्रिमंडळात होते, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी शुक्रवारी एका पत्रकार परिषदेत केला. दाऊदचा हस्तक असलेल्या या मंत्र्यांची मोदींनी हकालपट्टी का केली नाही? या दाऊदच्या हस्तकाला सरकारमध्ये का ठेवले याचे उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्यावे, असे आव्हान त्यांनी दिले. निवडणुकीच्या तोंडावरच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना राज्य सहाकारी बँक घोटाळा प्रकरणी व पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांचे दाऊदच्या हस्तकाशी संबंध असल्याच्या संशयावरून त्यांची ईडीची चौकशी लावली. पटेल यांचे दाऊदशी संबंध आहे असे काही वृत्तवाहिन्यांनी दाखवून पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. विरोधी नेते सर्व चोर आहेत, असा आरोप करून राष्ट्रवादीला बदनाम करण्याचा डाव भाजपाने रचला होता, असा आरोपही मलिक यांनी केला. पुरुषोत्तम सोलंकी मुंबईत काँग्रेसचे नगरसेवक होते. त्यावेळी भाजपाचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी अधिवेशनात सोलंकी हा दाऊदचा हस्तक असल्याचा आरोप करत त्यांच्यावर कारवाईची मागणी लावून धरली होती. त्यावेळचे तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी सोलंकी यांच्यावर कारवाई केली होती. सोलंकी यांनी गुजरातमधून भाजपातून विधानसभेची निवडणूक लढवली. त्यांच्या विजयानंतर मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी सरकारमध्ये मंत्री म्हणून त्यांची वर्णी लावली. दाऊदचा हस्तक असलेल्या व्यक्तीला मोदींनी त्यांना १५ वर्षे सत्तेत का ठेवले, याचे उत्तर मोदींनी द्यावे, असेही ते म्हणाले.

अवश्य वाचा

कलिंगडाची गोडी महागली