श्रीवर्धन 

 193 श्रीवर्धन विधानसभा मतदार संघात यावेळेला धक्कादायक निकाल समोर आला आहे. शिवसेना-भाजपा व मित्रपक्षांच्या युतीचे उमेदवार विनोद घोसाळकर यांना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार  खासदार सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे यांनी तब्बल 39 हजार 621 मतांचे मताधिक्य घेऊन मोठा विजय संपादन केला आहे. या निवडणुकीमध्ये शिवसेना-भाजप व मित्रपक्षांचे उमेदवार विनोद घोसाळकर हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार आदिती तटकरे यांच्या समोर मोठे आव्हान निर्माण करतील असे वाटले होते. तसेच श्रीवर्धन मतदारसंघातील लढत अतिशय अटीतटीची होऊन अतिशय कमी मताधिक्याच्या फरकाने उमेदवार विजयी होईल असे बोलले जात होते. परंतु हे सर्व अंदाज फोल ठरवत आदिती तटकरे यांनी 39 हजार 621 मतांची आघाडी घेऊन खूप मोठा विजय संपादन केला आहे. 2009 साली सुनील तटकरे यांनी प्रथम श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवून या मतदारसंघावर आपले वर्चस्व निर्माण केले होते. त्यानंतर 2014 च्या निवडणुकीमध्ये त्यांचे पुतणे अवधूत तटकरे यांनी 77 मतांच्या फरकाने निसटता विजय संपादन केला होता. मात्र 2019 च्या निवडणुकीमध्ये अदिती तटकरे यांनी 39 हजार 621 मतांची आघाडी घेऊन सगळ्यात मोठा विजय संपादन केला आहे. कारण सुनील तटकरे यांनी 2009 देखील एवढे मोठे मताधिक्‍य मिळवले नव्हते. श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात उमेदवार निहाय पडलेली मते अदिती तटकरे 39621, विनोद घोसाळकर 52453, सुमन सकपाळ बहुजन समाज पार्टी 777, संजय गायकवाड मनसे 1443, अकमल कादरी मुस्लिम लिग 330, बहुजन मुक्ती पार्टी रामभाऊ मंचेकर 281, डॉक्टर मूवीज शेख अपक्ष 1057, गीता वाढई अपक्ष 115, दानिश लांबे अपेक्ष 443, देवचंद म्हात्रे अपक्ष 366, ज्ञानदेव पवार काँग्रेस 844, भास्कर कारे अपक्ष 673, महक पोपेरे अपक्ष 401, संतोष पवार अपक्ष1183, नोटा 3772, अदिती तटकरे या विजयी घोषित झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार सुनील तटकरे त्याचप्रमाणे त्यांचे पुत्र आमदार अनिकेत तटकरे यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या असंख्य कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्रा पासूनच आदिती तटकरे यांची मिरवणूक श्रीवर्धन शहरात काढण्यात आली.

अवश्य वाचा

कलिंगडाची गोडी महागली