चिपळूण

चिपळूण-संगमेश्वर २६५ मतदारसंघातील अटीतटीच्या झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार शेखर निकम यांनी विधानसभेचा गड सर केला तर शिवसेनेचे सदानंद चव्हाण यांची होणारी हॅट्रिक चुकली. चिपळूण मतदारसंघांमध्ये सुरुवातीपासूनच या दोन्ही उमेदवारांमध्ये अटीतटीचा सामना पाहण्यास मिळाला .राष्ट्रवादीचे शेखर निकम यांना एकूण मते एक लाख पाचशे वीस तर शिकसेनेचे सदानंद चव्हाण यांना एकूण मते एकहत्तर हजार दोनशे तेवीस मते मिळाली.

शेखर निकम २९२९७ मतांनी विजयी होऊन चिपळूण संगमेश्वरचे आमदार झाले. महाराष्ट्रात कमी उमेदवार असणारा असणाऱ्या या मतदारसंघात शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असाच थेट सामना रंगला तर बसपाचे उमेदवार सचिन मोहिते नाममात्र ठरले .सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या फेरीपासून ते चोविसाव्या फेरीपर्यंत राष्ट्रवादीचे शेखर निकम यांनी आपली विजयी आघाडी कायम राखली. मतमोजणी दरम्यान सातव्या फेरी नंतर शिवसेनेचे उमेदवार सदानंद चव्हाण हे मतदार कक्षातून बाहेर पडले त्याच वेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आपला विजय निश्चित मानला. मतमोजणी केंद्राच्या बाहेरील बाजूस मेहता पेट्रोल पंपाच्या दिशेला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक फेरीअखेर विजयाचा जल्लोष केला. यावेळी कार्यकर्त्यांनी ढोल ताशे, फटाके आणि घोषणांच्या एकच जल्लोष करत शेखर निकम यांचा विजय साजरा केला. विजयानंतर राष्ट्रवादीचे उमेदवार शेखर निकम यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की की निवडणूक घासुन होणार असे चित्र निर्माण झाले होते . मात्र तसे काही झाले नसून गेले पाच वर्ष मी कार्यकर्त्यांसोबत घेत असलेली मेहनत आणि मतदारांचे प्रेम यामुळे हाविजय माझा एकट्याचा नसून सर्व कार्यकर्त्यांचा आहे. विजयानंतर त्यांची संपूर्ण चिपळून शहरातून विजयी मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर सावर्डे येथील त्यांच्या निवासस्थानी पर्यंत मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत विजय अभूतपूर्व अशी मिरवणूक काढण्यात आली. सदानंद चव्हाण हे गेली दहा वर्ष या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत होते मागील २०१४ च्या निवडणुकीत देखील शिवसेनेचे सदानंद चव्हाण आणि राष्ट्रवादीचे शेखर निकम यांच्यातच लढत झाली होती. त्यावेळी शेखर निकम यांचा 5000 च्या आसपास मतांनी पराभव झाला होता. त्याच्यासोबत चिपळूण मतदारसंघाला सलग दोन वेळा निवडून येण्याची परंपरा असून तिसऱ्यांदा आत्तापर्यंत कोणीही निवडून आले नसल्याचे सर्वश्रुत आहे. याचीच परिणिती आणि शेखर निकम यांनी गेल्या पाच वर्षात पदरमोड करून मतदारसंघात केलेला विकासाचा झंजावात आणि अविरत परिश्रम यामुळे त्यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. यावेळी माजी आमदार रमेश कदम ,तालुकाध्यक्ष जयेंद्र खताते, क्षेत्राध्यक्ष दादा साळवी,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हा उपाध्यक्ष शौकत मुकादम, महिला जिल्हाध्यक्ष चित्रा चव्हाण ,शेखर निकम यांच्या पत्नी सभापती पूजा निकम, नगरसेवक सुधीरशेठ शिंदे, आदिती देशपांडे, रिहाना बिजले,नगरसेवक बिलाल पालकर वर्षा जागूष्टे, सफा गोटे, फेरोझा मोडक, संजीवनी शिगवण, राजेश कदम, पंचायत समिती सदस्य अबू फसाळे, खेर्डीचे दशरथ दाभोळकर, रियाज बिजले,पं स सदस्य बाबू साळवी,राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मिलिंद कापडी ,काँग्रेसचे शहराध्यक्ष रतन पवार ,आरपीआयचे राजू जाधव आणि आघाडीतील सर्व घटक पक्षांचे मान्यवर आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

अवश्य वाचा

कलिंगडाची गोडी महागली