युद्ध हे अश्वत्यामाप्रमाणे अजरामर आहे. मानवाच्या हजारो वर्षाच्या इतिहासात युद्ध नाही असे होणारच नाही. युद्धालाही तिटकारा वाटावा असे पहिले महायुद्ध झाल्यावर अवघ्या दोन दशकांत दुसऱ्या महायुद्धाने विशेषतः अमेरिकेने टाकलेल्या अणुध्वमामुळे साऱ्या मानवजातीला शरमेने मान खाली घालायला लावली. हे कुठेतरी थांबायला पाहिजे असे आता युद्धाची खुमखुमी असणाऱ्या देशांनाच वाटू लागले आणि मग मानवजातीच्या उद्धारासाठी युडो विल्सनने स्थापलेला ‘राष्ट्रासंघ’ आठवला. राष्तासंघापेक्षा एखादी प्रभावी आंतरराष्ट्रीय संघटना जागतिक शांततेसाठी असावी असे जगाला वाटू लागले.

१९४१ ला अमेरिकेचे रूझवेल्ट आणि इंग्लंडचे चर्चिल या दोघांनी अटलांटिक समुद्रात एका जहाजावर भेट घेतली. जागतिक शांततेच्या संदर्भात दोघांमध्ये चर्चा होऊन रूझवेल्ट यांनी प्रथम ‘संयुक्त राष्ट्रसंघ’ हा शब्दप्रयोग वापरला. त्यानंतर त्यांनी अटलांटिक चार्टरच्या जाहीरनाम्यावर सह्या केल्या. त्यात जागतिक शांततेवर  भर देण्यात आला. यानंतर १९४२ रोजी वॉर्शिग्टन परिषदेत जगातील २६ राष्ट्रांनी भाग घेऊन अटलांटिक सनदेला [पाठींबा दिला. १९४४ ला रूझवेल्ट, स्टॅलिन, चर्चिल ह्यांनीएकत्र येऊन जाहीर केले की, जागतिक शांततेसाठी संयुक्त राष्ट्रासारख्या आंतरराष्ट्रीय संघटनेची हे. पुढे महायुद्ध संपल्यावर २६ जून, १९४५ रोजी अमरिकेतील सॅनफ्रान्सिस्को या शहरात जगातील ५० राष्ट्रे एकत्र आली. त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या सनदेवर सह्याकेल्या.आणि अखेरीस मानवाच्या कल्याणासाठी २४ ऑक्टोबर, १९४५ रोजी संयुक्त राष्ट्र संघटना उदयाला आली. ‘विश्वशांती’ हा या संघटनेच्या स्थापनेमागील प्रमुख हेतू होय.

या शिवाय

- आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता राखणे

- राष्ट्राराष्ट्रांत स्नेहसंबंध वाढविणे.

- सैन्यबळाचा उपयोग न करणे.

-  राष्ट्रांच्या अंतगर्त  कारभारात  युनो हस्तक्षेप  करणार नाही.

ही संयुक्त राष्ट्रसंघाची तत्त्वे आहेत .

संयुक्त राष्ट्रसंघाच्या सनदेत  चिनी, इंग्रजी, फ्रेंच, रशियन आणि स्पॅनिश या पाच अधिकृत भाषा आहेत. अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातील ४२ मजली इमारतीत संयुक्त राष्ट्र संघाचे प्रमुख कार्यालाय आहे. इमारतीच्या ४२ व्या मजल्यावर संयुक्त राष्ट्रसंघाचा फिक्कट निळ्या रंगाचा झेंडा मोठ्या दिमाखात फडकत असतो. संयुक्त राष्ट्रसंघाची एकूण सोळा उपांगे आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाच्या रचनेत महासभा, आर्थिक व सामाजिक समिती, आंतरराष्ट्रीय न्यायालय व सुरक्षा  परिषद ही सर्वात महत्त्वाची असून त्यात इंग्लंड, अमेरिका, रशिया, फ्रान्स व चीन यातील एकाही राष्ट्राने 'व्हेटो' चा वापर केल्यास तो प्रस्ताव बारगळतो. उदा. काश्मिर प्रश्नि रशियाने 'व्हेटो' वापरून आपली बाजू सावरली होती.

संयुक्त राष्ट्रसंघटना छोट्या छोट्या राष्ट्रांचे प्रश्न सोडविण्यात यशस्वी झाली असली तरी बड्या राष्ट्रांच्या दादागिरीला ती आवरु शकली नाही. अमेरिका तर युनो आपल्या खिशातच आहे अशी वावरते. संयुक्त राष्ट्रसंघटनेचे माजी अध्यक्ष कोफी अन्नान  आता म्हणतात की, इराकयुद्ध बेकायदेशीर आहे. पण जेव्हा अमेरिकेने इराकवर हल्ला केला तेव्हा संयुक्त राष्ट्रसंघटना मूग गिळून गप्प बसली होती. भारताच्या बाबतीत तर पाकिस्तानातील बाजू घेऊन संयुक्त राष्ट्रसंघाने नेहमीच  पक्षपात केला आहे. त्यामुळे कधी कधी असे वाटते की, युनोतही राजकारण आहे.

असे असले तरीही मानवाच्या भल्याचे अनेक उपक्रम संयुक्त राष्ट्रसंघ आज राबवत आहे. संयुक्त राष्ट्रसंघटना प्रभावी होण्यासाठी आपणच एक शिस्त  पाळली पाहिजे, जसे खेळताना पंचांचा निर्णय हा अखेरचा असतो तसेच संयुक्त राष्ट्रसंघाचा निर्णय हा अखेरचा असून तो मी मानेनच, असे सर्व जगातील राष्ट्रांनी ठणकावून सांगितल्यावर खऱ्या अर्थाने  संयुक्त राष्ट्र दिन साजरा होईल.

२४ ऑक्टोबर -  इतर दिनविशेष

१)  विकासाच्या माहितीचा विश्वदिन.

२) १५७७ - शीख गुरु रामदास यांच्याकडून अमृतसर शहराचे नामकरण.

३) १८९० -  भारतीय भौतिकशास्त्रज्ञ शिशिरकुमार मित्र यांचा जन्म.

४) १९०८ -  भारतीय विमानविषयक संशोधन विष्णू माधव घाटगे यांचा जन्म.

५) १९९२ -  मराठी नवकथेचे एक जनक अरविंद गोखले यांचे निधन.

अवश्य वाचा

मुरूड - अलिबाग बस नादुरुस्त...