सांगोला 

सांगोला विधानसभा  निवडणुकीसाठी 2 लाख 93 हजार 969 मतदार असून यातील सुमारे 22 हजार 593 नवमतदार पाहिल्यादाच मतदान करणार आहेत व हेच नवमतदार निर्णायक ठरणार आहेत.

मतदार नोंदणीत तरुणांचा पुढाकार उल्लेखनीय असून सांगोला विधानसभा मतदारसंघात 22 हजार 593 तरूण नवमतदार प्रथमच विधानसभेसाठी मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तर लोकसभा निवडणुकीनंतर विशेष मतदार नोंदणी कार्यक्रम राबवून सुमारे 4 हजार 557 नवीन मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. त्यामुळे हे मतदार आपल्या पक्षाकडे आकर्षित करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष सरसावले आहेत.

मतदार नोंदींनीत यंदा 11 हजार 692 पुरुष मतदार तर 10 हजार 901 स्त्री मतदार अशी 22 हजार 593 नवमतदारांची वाढ झाली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी 1 लाख 56 हजार 091 पुरुष मतदार व 1 लाख 37 हजार 878 स्त्री मतदार अशी 2 लाख 93 हजार 969 इतकी झाली आहे. तर मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत सांगोला विधानसभा मतदारसंघात 2 लाख 89 हजार 412 इतके मतदार होते. लोकसभा निवडणुकीनंतर पाच महिन्याच्या कालावधीत 2 हजार 070 पुरुष मतदार तर 2 हजार 487 स्त्री मतदार अशी 4 हजार 557 इतक्या नवीन मतदारांची नोंदणी झाली आहे त्यामुळे येणार्या  निवडणुकीत 22 हजार 593 नविन मतदार पहिल्यांदाच मतदान करणार आहेत.

अवश्य वाचा

रो- रो सेवा महागडी

रायगडातील कवींचा सन्मान.