सांगोला

  सांगोला शहरातील नेहमीच गर्दी व वर्दळीचे ठिकाण असणाऱ्या स्टेशन रोडवर दुचाकी वरुन पाठीमागून आलेल्या दोन इसमांनी सायकलीने जाणाऱ्या जेष्ठ नागरिकास तुमच्या खिशातून पैसे पडले आहेत असे सांगत जेष्ठ नागरिकाच्या सायकलीला असणाऱ्या हॅण्डेलला लावलेली सुमारे 1 लाख रु.रोकड असलेली पिशवी झटका देवून पळवून नेल्याची घटना सोमवार दि.14 ऑक्टोबर रोजी दु.12 वा.च्या सुमारास घडली असून याबाबत अज्ञात चोरट्या विरोधात सांगोला पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अशोक केदार, रा.सांगोला यांनी फिर्याद दिली आहे.

   याबाबत अधिक माहिती अशी की, अशोक केदार हे शहरातील युनियन बॅंकेत पैसे काढण्यासाठी आले होते. त्यांनी बॅंकेतून 1 लाख रु.काढले. त्यापैकी 800 रुपये ची रक्कम खिशात ठेवून उर्वरीत 99 हजार 200 रु.ची रक्कम व पासबुक बॅगेत ठेवून ती पिशवी सायकलच्या हॅण्डेलला अडकवून परत फुले चौकाकडून घराकडे जात होते. याचवेळी त्यांच्या पाठीमागून दुचाकीवरुन आलेल्या दोन इसमांनी उजव्या बाजूने येवून तुमच्या खिशातून पैसे पडले आहेत असे सांगितले. यावेळी अशोक केदार यांनी सायकल  उभी करुन स्टॅण्डला लावून पडलेले पैसे घेण्यासाठी माघारी आले असता त्याचवेळी सदर इसमाने 99 हजार 200 रु.ची रोकड असलेली पिशवीला झटका देवून घेवून पोबारा केला.

अवश्य वाचा

रो- रो सेवा महागडी

रायगडातील कवींचा सन्मान.