सांगोेला

ज्याप्रमाणे सांगोला आणि दुष्काळ समीकरण बनले होते त्याप्रमाणे विधानसभा आणि आमदार फक्त गणपतराव देशमुख असेही राजकीय समीकरण अवघ्या देशाने बघीतले आहे. त्याचे एकमेव कारण म्हणजे सांगोला तालुक्यातील बहुतांशी मतदारांनी आ.गणपतराव देशमुख यांच्यावर  दाखविलेला  तब्बल 55 वर्षाचा विश्‍वास आणि हीच विश्‍वासाची परंपरा युवा पिढीही जपण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. विरोधकांकडून प्रचारामध्ये अनेक वेळा सांगितले जाते आमच्या 4 पिढ्या  बरबाद केल्या याला उत्तर म्हणून याच 4 पिढ्यांचा वारसा  जपणार्‍या शेतकरी कामगार पक्षाच्या युवा कार्यकर्त्यांची हजारोच्या संख्येतून  चक्क प्रचाराची धुरा हाती घेेवून देण्यात आला आहे.अशी प्रतिक्रिया शेकापच्या युवा कार्यकर्त्यांनी आमचे सांगोला तालुका प्रतिनिधी नवीद पठाण यांच्याशी बोलताना दिली.

एका  बाजूला विरोधकांकडून आजोबांनी मतदान करुन आ.गणपतराव देशमुख यांना आमदार करण्याची चूक केली असल्याचा प्रचार केला जात आहे. तर दुसर्‍या बाजूला ज्या आजोबांनी भक्कमपणे शेकापक्षाला पाठिंबा दिला त्याच आजोबांची नातवे सध्या शेकापक्षाचा प्रचार अगदी जोरात करत आहेत. त्याचे एकमेक कारण  म्हणजे आजपर्यंत  आ.गणपतराव देशमुख यांनी जनतेेच्या विश्‍वासाला कधीही तडा जाऊ  दिला नाही. आमदारकी ही स्वत:ची जाहगिरी न समजता ज्या मतदारांनी त्यांच्यावर विश्‍वास टाकला त्यांच्या प्रत्येक सुखदुखा:त सहभागी होवून एक अनोखा विश्‍वासाचा व शांतीचा ऋणानुबंध निर्माण केला आहे.

महाराष्ट्रात नव्हे तर देशात राजकीय निष्ठेचे उत्तम नव्हेे तर  अतिउत्तम उदाहरण म्हणून आ.गणपतराव  देशमुख यांच्याकडे पाहिले जाते.  बदलत्या काळाबरोबर लोकांची निष्ठा बदलते. स्वत:च्या स्वार्थासाठी राजकीय दैवतही बदलण्यासाठी अनेकजण मागे-पुढे पाहत नाहीत. वार्‍याची दिशा बघून अनेक नेते वार्‍याबरोबर पळत असताना दिसतात.तर  दुसर्‍या बाजूला एकच पक्ष, एकच मतदार  संघ आणि पुरोगामी विचार जपून विश्‍वास आणि निष्ठा याचे आदर्श उदाहरण आ.गणपतराव देशमुख यांनी इतिहासाच्या पानांपानावर लोकांच्याच  मतांच्या आधारे कोरला. त्यांच्या आजपर्यंतच्या निवडणुकातील विजयामध्ये युवकांचा मोठा वाटा आहे. आताही प्रचारसभेत मोठ्या प्रमाणात युवा वर्ग सक्रिय झाला असल्याचे दिसत आहे.

शेतकरी कामगार पक्षाने विधानसभा निवडणुकीत युवा उमेदवार म्हणून डॉ.अनिकेत देशमुख यांना मैदानात उतरवून सांगोला तालुक्यातील विरोधकांना नव्हे तर महाराष्ट्रातील सर्व  राजकीय पक्षांना आत्मचिंतन करावयास भाग पाडले आहे. यापूर्वीच्या अनेक निवडणुकात विरोधकांनी आ.गणपतराव देशमुख यांना वयोमानामुळे राजकीय संन्यास घेण्याचा सल्ला दिला. परंतू सध्या सर्व उमेदवारांची तुलना करता अनेकजण वयाच्या साठीकडेे जात आहेत. तर दुसर्‍या बाजूला शेकापक्षाचा उमेदवार हा नवतरुण आहे. उमेदवारीच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे शेतकरी कामगार पक्षाने आता विरोधकांनी राजकीय सेवानिवृत्ती घ्यावी, असा संदेश दिला आहे.

 

अवश्य वाचा

रो- रो सेवा महागडी

रायगडातील कवींचा सन्मान.