नाशिक, 

      राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते भारतीय सेना विमानन कोरला प्रतिष्ठेचे समजले जाणारे सन्मानाचे ‘राष्ट्रपती निशाण’ प्रदान करण्यात आले. भारतीय सेना विमानन कोरच्या सैनिकांनी राष्ट्राची प्रतिष्ठा आणि गौरव वाढविण्यात विशेष योगदान दिल्याचे गौरवोद्गार यावेळी राष्ट्रपतींनी काढले.

            गांधीनगर एअरफिल्ड येथे झालेल्या या शानदार संचलन कार्यक्रमाला राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत, राष्ट्रपती महोदयांच्या सुविद्य पत्नी श्रीमती सविता कोविंद, ले.ज.पी.एस.राजेश्वर, ले.ज.एस.के.सैनी, ले.ज. कवलकुमार,  श्रीमती मधुलिका रावत आदी उपस्थित होते.

            राष्ट्रपती श्री. कोविंद म्हणाले, सेना विमानन कोरने मागील 32 वर्षात अतुलनीय साहस आणि शौर्याचा परिचय देत अनेक मोहिमा यशस्वी केल्या. या कालावधीत आर्मी एव्हिएशनला 273 सन्मान आणि पुरस्कारदेखील प्राप्त झाले. सियाचीनसारख्या भागात अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत दृढनिश्चयाचा परिचय देत भारतीय सेनेला अभिमान वाटेल अशी कामगिरी या सैनिकांनी केली. त्यांच्या त्याग आणि शौर्यामुळे देशात शांतता नांदते, असेही श्री.कोविंद यांनी सांगितले.

अवश्य वाचा

तळोजातील घराला आग