मोहोपाडा

रसायनी पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड प्रायव्हेट कंपनीतील एल एबी विभागातील प्लांटमधील गॅस लिकेज होवून आग लागल्याचे विश्र्वसनीय सुत्रांनी सांगितले. लागलेल्या आगीने दोन तास उग्र रूप धारण केल्याने अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक परिश्रम करून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.सिध्देश्वरी कार्नर जवल रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचा एल एबी विभाग आहे.या विभागातील नागरीकांना विशिष्ट प्रकारचा वास रसायनी व आसपासच्या परिसरातील काही किलोमीटर अंतरावरील नागरीकांना गेला.यावेली कंपनीने काही कामगारांना गेटबाहेर काढले.यावेली चार ते पाच किलोमीटर अंतरावर परीसरात विशिष्ट प्रकारच्या प्लास्टीक जलाल्याचा वास हवेवाटे नागरीकांना आला.यावेली जोराचा आवाजही झाला परंतु यात काहीही जिवित अथवा इतर हानी न झाल्याचे सांगण्यात आले.यावेली आग आटोक्यात आणण्यासाठी परीसरातील विविध कंपन्यांच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्यतीचे प्रयत्न केले.व काही तासांतच आग आटोक्यात आणली.या प्रकारात कंपनीचे कोणतेही नुकसान न झाल्याचे कंपनी पदाधिकारी सांगत आहेत.परंतु रिलायन्स कंपनीत याअगोदरही आग लागण्याची घटना घडली असून कंपनीने सुरक्षिततेची उपाययोजना करावी अशी मागणी नागरीक करीत आहेत.

अवश्य वाचा