पाली/बेणसे 

  रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात भेलीव येथील मृगगड किल्ल्यावर दुर्गवीर प्रतिष्ठान तर्फे श्रमदान मोहीम राबविण्यात आली. या मोहीमेत एकूण 40 दुर्गवीरांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये पाच महिला सदस्य देखील हिरहिरीने सहभागी झाल्या होत्या. या मोहीमेचे नेतृत्व दुर्गवीर प्रतिष्ठानचे रामदास घाडी, सचिन रेडेकर, रविंद्र रावराणे यांनी नियोजीत रीतीने पार पाडले. याच बरोबर चिपळूण व संगमेश्वर येथून आलेले दुर्गवीर राकेश इंदुलकर व रोहीत बालडे आणि त्याचबरोबर पाच महिलांचा ही या मोहीमेत सक्रीय सहभाग होता.

    या मोहिमेत दुर्गवीर प्रतिष्ठानच्या दुर्गवीरांनी मृगगडावरील मोठ्या टाक्यातील मोठं मोठे दगड चैन पुलीच्या सहाय्याने बाहेर काढले. त्यामुळे आता या टाक्यात पाणी चांगल्या प्रकारे साठणार आहे. परिणामी गडावर येणाऱ्या पर्यटकांना त्याचा वापर होऊ शकतो. या बरोबरच दुर्गवीरांनी गडावरील शेवाळ आलेल्या पायऱ्यांवर चूना पावडर टाकून त्या स्वच्छ केल्या. त्यामुळे गडावर आता न घसरता सुरक्षितपणे जाता येऊ शकेल. बैलगाडी जाईल एवढया रुंद पायवाटे वरिल गवत काढले. तसेच जोत्यांचे अवशेष, सदर आणि मंदीर परिसरातील वाढलेले गवत काढले. त्यामुळे मृगगड आता पूर्णपणे स्वच्छ होऊन पुन्हा सुस्थितीत आला आहे. 

अवश्य वाचा