सांगोला

सांगोला शहरातील जुनी उर्दू शाळा व वाचनालया समोर असणाऱ्या वीज पुरवठा करणाऱ्या विद्युत खांबावर वेलीची वाढ जोरात झाली असल्याने या वेलीने विद्युत खांबालाच विळाखा दिला असल्यामुळे सदरचे विद्युत खांब हे धोक्याचे बनले असून वीज पुरवठा करणारा खांब वेलीचा फ्लॉवर पॉट असल्यासारखे दिसत आहे.


या विद्युत खांबावरुन वीज पुरवठा करण्यात येतोपरंतु याच्यावरच वेल मोठ्या प्रमाणात वाढली असून विद्युत तारांसह खांबाचा वरचा बहुतांशी भाग भीषण असा झाला आहे. खांबावरुनच आपला मुक्काम वेलीने न थांबवता ज्या-ज्या दिशेने या खांबावरुन तारा गेलेल्या आहेत त्या तारांनाही वेढा देत या वेलीने आपली वाढ सुरु ठेवली आहे. त्यामुळे या खांबामुळे एखादी अनुचित घटनाही घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

खांबाला लागूनच व्यापारी संकुल व सार्वजनिक लघुशंकेची सोय असलेली इमारत आहे. या इमारतीवरुन वेलीने खांबावर अतिक्रमण केले आहे. त्यामुळे आणखीनच सदर खांब धोक्याचा बनत आहे. तरी महावितरण कंपनीने किंवा सांगोला नगरपालिकेने या खांबाचे वेलीच्या विळाख्यातून मुक्तता करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे. मोठ्या प्रमाणात वाढलेल्या वेलीमुळे संबंधीत विभागाचे लक्ष आहे कोणीकडे असा सवाल उपस्थित केला जात आहेअन्यथा वीजेचा पुरवठा करणारा खांब एखाद्यासाठी आयुष्याचा करंट देणारा बनण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अवश्य वाचा

रो- रो सेवा महागडी

रायगडातील कवींचा सन्मान.